HomeBreaking Newsशब्दांकूर फॉऊडेशन संचालित शब्दांकूर साहित्य व सांस्कृतिक मंचाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर... अध्यक्षपदी...

शब्दांकूर फॉऊडेशन संचालित शब्दांकूर साहित्य व सांस्कृतिक मंचाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर… अध्यक्षपदी सुशांत मुनगंटीवार तर सचिवपदी अतुल येरगुडे

शब्दांकूर फाऊंडेशन,चंद्रपूर ही एक नोंदणीकृत संस्था असून शैक्षणिक, सामाजिक,साहित्यिक,कला व क्रीडा क्षेत्रात कार्य करणारी आहे.”एक ध्यास…परिवर्तनाचा” हे ब्रीद घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे त्यामुळे शब्दांकूर साहित्य व सांस्कृतिक मंच जिल्हा चंद्रपूरची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

जिल्हा कार्यकारिणी निवडीप्रसंगी अध्यक्षपदी चंद्रपूरचे ज्येष्ठ साहित्यिक ‘पुढील तपासकार’ विजय वाटेकर सर होते.भविष्यात शब्दांकूर उंच भरारी सर्व क्षेत्रात घेण्याची भविष्यवाणी केली तर प्रमुख अतिथी म्हणून जीवन गौरव मासिक जिल्हा भंडाराचे सहसंपादक तथा ‘झिबली’कार गणेश कुंभारे सर उपस्थित होते त्यांनी एकसंघ व एकदिलाने साहित्य सेवा करावी असे मनोगतातून व्यक्त केले.

सामाजिक,साहित्यिक क्षेत्रात विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी “शब्दांकूर साहित्य व सांस्कृतिक मंच”च्या अध्यक्षपदी कवी सुशांत मुनगंटीवार तर सचिवपदी नाट्यकलावंत,कवी अतुल येरगुडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.उपाध्यक्षपदी कवी संभाशिव गावंडे,कार्याध्यक्ष कवी नेतराम इंगळकर, कोषाध्यक्ष कवी तानाजी अल्लीवार,सहसचिव कवी ऋषीकेश तांडेकर,तंत्रनिर्देशक व ग्राफिक्सकार कवी विघ्नेश्वर देशमुख,प्रसिद्धी प्रमुख पत्रकार गणेश पिंपळशेंडे,महिला आघाडी प्रमुख कवयित्री शीतल कर्णेवार,महिला प्रतिनिधी अर्चना जिडकुंठावार व सदस्य कवी योगेश धोडरे,कवी सुरज दहागावकर,कवी राहुल पिंपळशेंडे कवी सचिन चिमुरकर आदींची एकमताने निवड करण्यात आली आहे.

शब्दांकूर साहित्य व सांस्कृतिक मंच जिल्हा कार्यकारिणी निवडीचे सूत्रसंचालन कवी किशोर चलाख यांनी केले तर प्रास्ताविक दुशांत निमकर यांनी केले.आभार प्रदर्शन राकेश शेंडे यांनी केले.यावेळेस शब्दांकूर फाऊंडेशनचे पदाधिकारी राजेश्वर अम्मावार,सौ.उषा निमकर,प्रशांत खुसपुरे,आशिष ढवस इत्यादी उपस्थित होते.नवनियुक्त सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!