अनिकेत ओल्लालवार यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेत कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात येणार… कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कडून जण मित्राची दखल …

0
318

तालुका प्रतिनिधी,अहेरी

हक्काची जाणीव झाली की माणूस सर्वप्रथम कर्तव्याकडे वडतो,कर्तव्य बजावताना आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे आणि मनापासून पर पाडणे हेच संबंधित कर्मचाऱ्यांचे कार्य असते.

अहेरी तालुक्यातील बोरी गावातील अनिकेत ओल्लालवार हा कमी वयातच महावितरण कंपनीमध्ये जनमित्र( लाईनमन ) म्हणून रुजू झाला. बोरी परिसरातील गावांचा त्याच्याकडे जबाबदारी आहे.अतिशय मनमिळावू आणि हवे तेव्हा लोकांच्या अथवा विजेच्या समस्या उद्भवल्या की रात्र बेरात्र वेळेची पर्वा न करता धावून जाणारा कर्मचारी म्हणून अनिकेत ओल्लालवार ची ओळख आहे.

काही दिवसा अगोदर वार्ता आली की बोरी गावातील वीज व्यवस्था खोळंबली आहे.कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.या वार्तेत काहीच तथ्य नाही.संबंधीत परिसरातील जबाबदार कर्मचारी जातीने लक्ष घालून कोणत्याही प्रकारे कर्तव्यावर कसूर होत नसल्याचे वास्तववादी चित्र जनतेसमोर उभे आहे.

आपल्या निष्ठावंत आणि निस्वार्थ सेवेमुळे बोरी परिसरातील नागरिकांवर स्तुतीसुमनांची छाप पाडली आहे. देशात कोरोना विषानुने थैमान घातला असून जनजीवन पुरता विस्कळीत करून टाकला आहे. राज्यात लॉक डाऊन करण्यात आलेले असताना विनाकारण घराबाहेर पडू नये असे नागरिकांना शासन आदेश निर्गमित केले आले. अशातच निसर्गाने देखील नागरिकांच्या जीवावर कोपला असून मागील आठवड्यात तर कहरच केला चक्रीवादळासह अवकाळी पावसामुळे कित्येक परिसरातील झाडे तुटून पडली त्यामुळे वीज वितरण प्रणालीत बिघाड आला, तुटलेल्या झाडांमुळे विजेची तारे तुटली, वादळामुळे एकमेकांत तारा गुंतून गेल्या,डि.ओ. उडाले अनेक ट्रांसफार्मर मध्ये बिघाड झाला अशा बिकट परिस्थितीत देखील अनिकेत ओल्लालवार या कर्मचाऱ्याने आपले निःस्वार्थ कर्तव्य बजावत परिसरातील लोकांना विजेचा पुरवठा अविरत ठेवण्यासाठी तत्परता दाखविली.
जेव्हा केव्हा समस्या निर्माण झाली त्या त्या वेळेस तो तात्काळ सेवा पुरवायचा.

लॉकडाऊन च्या काळात कुठकाही संसर्ग होण्याची तमा न बाळगता अनिकेत ओल्लालवर आपले कर्तव्य पार पाडीत आहे. कोरोणाच्या पाश्र्वभूमीवर डॉक्टर, नर्सेस,पोलीस यंत्रणा जशी कार्य करीत आहे, त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांना कोरोनायोधा म्हणून गौरविण्यात येते त्याच प्रकारे महावितरण कंपनीमधील वीज पुरवठा करणारे जनमित्र(लाईनमन) यांचा सुद्धा कोरोणायोधा म्हणून गौरविण्यात यावे. समाजात ते सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहेत.अनिकेत ओल्लालवार यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत इंडिया दस्तक न्यूज टीव्ही तर्फे कोरोणा योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here