Advertisements
Home चंद्रपूर सरकारने वाढविलेल्या खताच्या किंमती कमी कराव्या:- राजु झोडे...#केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना...

सरकारने वाढविलेल्या खताच्या किंमती कमी कराव्या:- राजु झोडे…#केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचा राजू झोडे यांचा आरोप…

केंद्र सरकारने खतांच्या किमतीत व शेतीवरील संसाधनाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. खताच्या किमतीत पन्नास टक्क्याहून अधिक वाढ केंद्र सरकारने केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खत विकत घेणे कठीण झालेले आहे.

Advertisements

अशातच कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून केंद्र सरकार खतांच्या व शेतीवरील संसाधनाच्या मूल्य दरात वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी केंद्र सरकारवर केला.

सध्याचे भाजपा प्रणित केंद्र सरकार हे शेतकरीविरोधी असून खते, बी-बियाणे व शेतीवरील अवजारांच्या मूल्य दरात वाढ करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहे. डिझेलच्या वाढत्या किमती, खतांच्या व शेती अवजारांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे परंतु शेतकऱ्यालाच आज जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्याला बसत असून एकीकडे केंद्र सरकार दोन हजार रुपये देते तर त्याच शेतकऱ्यांकडून लाखो रुपयांची वसुली करून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडते. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होत असलेले नुकसान हे फार भयावह आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने खते, बी-बियाणे व शेतीवरील अवजारे यांच्या किमती तात्काळ कमी कराव्या या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात यांनी प्रधानमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.

वाढलेले खताचे दर व शेती वरील अवजाराच्या किमती कमी करण्यात आल्या नाही तर या विरोधात वंचित बहुजन आघाडी राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनात देण्यात आला. निवेदन देताना वंचित चे नेते राजू झोडे, संपत कोरडे, सचिन पावडे, नवीन डेविड, भुषण पेटकर, जॉकिर खान ,प्रदीप झांबरे, चेतन वासनिक तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या परिवर्तनाची प्रक्रिया पूर्ण करून विकास करा… खासदार बाळू धानोरकर यांची केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी…

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्य मार्ग म्हणून देखभालीचे काम केले जात आहे. त्यामुळे...

अन्नपुरवठा मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा- आम आदमी पार्टीच्या महिला अध्यक्ष ॲड. सुनिता पाटील यांची मागणी..

चंद्रपूर -आम आदमी पार्टी चंद्रपूर अध्यक्ष ऍड सुनीता पाटील यांच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या गोरगरीब जनतेचे धान्यावर डल्ला मारणाऱ्या दुकानदारावर व त्या दुकानदाराला शह...

अभिनंदन! पुजा डोंगेची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय वूशू स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर (कोरपना) : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन वूशू स्पर्धेत कवठाळा या छोट्याश्या गावातून कठीन परिश्रम घेत खेळाडू कु. पुजा गणपत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या परिवर्तनाची प्रक्रिया पूर्ण करून विकास करा… खासदार बाळू धानोरकर यांची केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी…

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्य मार्ग म्हणून देखभालीचे काम केले जात आहे. त्यामुळे...

अन्नपुरवठा मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा- आम आदमी पार्टीच्या महिला अध्यक्ष ॲड. सुनिता पाटील यांची मागणी..

चंद्रपूर -आम आदमी पार्टी चंद्रपूर अध्यक्ष ऍड सुनीता पाटील यांच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या गोरगरीब जनतेचे धान्यावर डल्ला मारणाऱ्या दुकानदारावर व त्या दुकानदाराला शह...

अभिनंदन! पुजा डोंगेची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय वूशू स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर (कोरपना) : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन वूशू स्पर्धेत कवठाळा या छोट्याश्या गावातून कठीन परिश्रम घेत खेळाडू कु. पुजा गणपत...

गोंडवाना विद्यापीठ सभागृहाच्या “डीडोळकर’ नामकरणाला स्थगिती

: माजी मंत्री वडेट्टीवारांच्या पत्राची गंभीर दखल गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला स्व.दत्ता डिडोळकर नाव देउन आदिवासी समाजातील थोर हुतात्मे तथा आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा ठराव...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!