Advertisements
Home राजकीय राजीव सातव यांची कोरोना विरोधातील लढाई अखेर अपयशी ठरली..राजीव सातव यांचा राजकीय...

राजीव सातव यांची कोरोना विरोधातील लढाई अखेर अपयशी ठरली..राजीव सातव यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊया थोडक्यात

भारताच्या राजकारणात एक महत्वाचे नेते म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे यांच्यावर पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. २९ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तातडीने गरज भासल्यास ‘इक्मो’ मशीनदेखील उपलब्ध करण्यात आली होती. परंतु, राजीव सातव यांची कोरोनाविरोधातील लढाई अखेर अपयशी ठरली. कोरोनाने आणखी एका महत्वाच्या नेत्याचा बळी घेतला. राजीव सातव यांची राजकीय प्रवास थोडक्यात जाणून घेऊ या…

Advertisements

१) काॅंग्रेस पक्षातील अत्यंत महत्वाचे समजले जाणारे राजीव सातव हे पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले होते. इतकंच नाही तर, दुसऱ्या प्रयत्नात थेट खासदारकीही त्यांनी मिळवली होती.

२) राज्याच्या राजकारणात कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणूनही राजीव सातव यांची ओळख निर्माण झाली होती.

३) कॉंग्रेस पक्षाच्या नव्या पिढीतील नेत्यांमधील एक धुरंधर आणि तरबेज राजकारणी म्हणून राज्यातच नाही, तर देशभरात त्यांना ओळखळे जात होते. राहुल गांधी यांच्या कोअर टीममधील हुकमी एक्का म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती.

४) राजीव सातव यांना आई माजी मंत्री रजनीताई सातव यांच्याकडून बालवयातच राजकारणाचं बाळकडू मिळालं होतं. त्यामुळे तरुणपणीच राजकारणात पदार्पण केलेल्या सातव यांची राजकीय वर्तुळात दमदार ओळख निर्माण झाली.

५) २००२ मध्ये कळमनुरी (जि. हिंगोली) पंचायत समितीच्या मसोड गणाचे ते सदस्य झाले होते. २००७ मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये सदस्य व कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती पद भूषविले होते.

६) २००९ मध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूण आहे होते. याच कालावधीत युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नंतर अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले होते.

७) देशभर नरेंद्र मोदींची लाट असताना त्या लाटेतही राजीव सातव २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हिंगोली मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले होते.

८) त्यांची संसदेतील भाषणं ही अभ्यासपूर्ण होती. लक्षवेधी माडंणी करण्याचं कसब त्यांच्याकडे असल्यामुळे राजीव सातव यांना सगल तिसऱ्यांदा ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

९) काॅंग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यात युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद, गुजरात विधानसभेच्या निवडणुकांमधील प्रचार, पंजाब राज्यात कॉंग्रेसचा सत्ता मिळवणे, या महत्वपूर्ण सर्व जबाबदाऱ्या राजीव सातव यांनी सहज पार पाडल्या होत्या.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

चंद्रपूरसह इतर विज उत्पादक जिल्ह्यांना 200 युनिट विज मोफत द्या…आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत केली मागणी…

चंद्रपूर: आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली असुन चंद्रपूरसह इतर 8 कोळसा आधारित औष्णिक...

चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस (ग्रामिण) ची पहिली आढावा बैठक संपन्न

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा आदरणीय संध्या ताई सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस ग्रामीण च्या अध्यक्षा नम्रता आचार्य - ठेमस्कर यांच्या...

महागाईची साडेसाती म्हणजे भाजप : खासदार बाळू धानोरकर…गोंडपिपरी येथे कार्यकर्ता मेळाव्यात युवकांचा मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये प्रवेश..

चंद्रपूर : या सात वर्षात देशातील शेतकरी, कामगार, सुशिक्षित बेरोजगार, महिला वर्गासह सर्वच घटक असमाधानी असल्याचे दिसत आहे. मागील काही महिन्यापासून देशात सातत्याने पेट्रोल...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अभिनंदन! पुजा डोंगेची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय वूशू स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर (कोरपना) : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन वूशू स्पर्धेत कवठाळा या छोट्याश्या गावातून कठीन परिश्रम घेत खेळाडू कु. पुजा गणपत...

गोंडवाना विद्यापीठ सभागृहाच्या “डीडोळकर’ नामकरणाला स्थगिती

: माजी मंत्री वडेट्टीवारांच्या पत्राची गंभीर दखल गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला स्व.दत्ता डिडोळकर नाव देउन आदिवासी समाजातील थोर हुतात्मे तथा आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा ठराव...

महिलांनी सक्रिय राजकारणात भाग घेऊन सत्याच्या बाजूने उभे व्हा : नम्रता ठेमस्कर

घुग्घूस : येथील तुकडोजी नगर वॉर्ड क्रं 06 येथे सौ. पदमा राजूरेड्डी यांच्या वतीने हळदी - कुंकू व वाण वाटप कार्यक्रम 28 जानेवारी रोजी...

व्यसनाधीन मद्यासक्ताच्या कुंटुबियांना आनंद व सुखाचे जीवन मिळावे यासाठी अँलअँनाॅन परिवार समुह करीत असलेले प्रयत्न समाजासाठी भूषणावह… -प्रा.शाम धोपटे

श्याम म्हाशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा संपादक) चंद्रपूर- अँलअँनाॅन परिवार समुह या आंतरराष्ट्रीय संगतीचा भाग असलेल्या "सुप्रभात अँलअँनाॅन परिवार समुह चंद्रपूर येथे स्थापन होऊन चार वर्ष पूर्ण...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!