Home चंद्रपूर कोरोनाच्या भीतीमध्ये आपण काय करू शकतो? सुरज पि.दहागावकर (उपसंपादक इंडिया दस्तक न्यूज...

कोरोनाच्या भीतीमध्ये आपण काय करू शकतो? सुरज पि.दहागावकर (उपसंपादक इंडिया दस्तक न्यूज टीव्ही) यांचा प्रबोधनात्मक लेख…

गेल्या एक-दीड वर्षापासून राज्यातच -देशातच नव्हे तर अख्या जगात कोरोनाने थैमान घातले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली, आरोग्य व्यवस्था कोडमडली, उपचार वेळेवर न मिळाल्याने कित्येकजण दगावली, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिसायच्या जागी भावपूर्ण श्रद्धांजलीचे मॅसेज दिसू लागली, कोरोनातून बरे होणाऱ्याकडे मीडिया गेली नाही परंतु स्मशानभूमीतील ग्राऊंड रिपोर्ट देऊ लागली, आज एवढी मेली, काल एवढी गेली अश्या कित्येक ब्रेकींग बातम्या टीव्ही वाल्यांच्या हेडलाईन बनत गेली. खरंतर हे सारं बघत असतांना मनात ‘भीती’ मात्र ठाण मांडून बसत गेली. मग आपण ही भीती दूर करण्यासाठी काय करू शकतो यावर विचारमंथन होणे अत्यंत आवश्यक आहे.

■ टीव्ही बंद करा: हल्ली आपण कोणतेही न्यूज चॅनेल उघडून बघा, मग ते स्थानिक असो, राज्य पातळीवरील असो, राष्ट्रीय पातळीवरील असो वा असो आंतरराष्ट्रीय पातळीवरील (काही अपवाद असेलही) हमखास कोरोनाबद्दलच दिवसभर ब्रेकिंग बातम्या चालत असतात. महत्वाचं म्हणजे या चॅनेलवाल्यांच्या बातम्या या दिलासादायक कमी आणि भीतीदायक जास्त असतात हे दिसून आले आहे. तेव्हा आपला टीव्ही हा काही दिवसासाठी बंद करा.

■ परिवाराला वेळ द्या: कोरोना येण्याआधी आपण पाहिजे तितका वेळ आपल्या परिवाराला/नातेवाईकांना देत नव्हतो. तेव्हा आपण कुठेही बाहेर न निघता, परिवाराला पूर्णपणे सुरक्षित ठेऊन घरीच राहावे. घरी राहून आई-वडील, पत्नी,पती, मित्र-मैत्रिणी, मुला-मुलींना तसेच इतरांना वेळ द्यावा. आपला वेळ परिवाराला दिला तर नक्कीच बिनकामाचा विचार आपण करणार नाही आणि यातून खरोखरच आपल्यासोबत सर्वाना समाधान मिळेल.

■ स्वतःला ओळखा: प्रत्येकामध्ये काहींना काही गुण असतातच. फरक एवढाच की, काहीजण त्याला ओळखतात तर काहीजण नाही. तेव्हा आता लॉकडाऊनमुळे आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तो वेळ स्वतःला ओळखण्यासाठी द्या! तासंनतास कोरोनाच्या बातम्या वाचण्यापेक्षा/बघण्यापेक्षा हे निश्चितच फायदेशीर होईल.

■ स्वतःच्या सवयी जपा: मित्रांनो, अश्या स्थितीमध्ये आपले छंद, सवयींना वाव द्या. त्यांचे जतन करा. होईल तेवढं स्वतःकडे असलेल्या स्किलमध्ये तरबेज होण्याचा प्रयत्न करा. सध्या तुमच्याकडे भरपूर वेळ आहे तेव्हा वेळेचा सदुपयोग करून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.

■ सोशल मीडियाचा वापर टाळा: सोशल मीडियाचा वापर आवश्यक असेल तरच करा. कारण व्हाट्सअप्प,फेसबुक युनिव्हर्सिटीचे कोरोना विषयक मॅसेज हे जास्तीत जास्त खोटे,अफवा पसरविणारे आणि भीती दाखविणारे येत आहेत. त्यामुळे गरज असेल तरच सोशल मीडियाचा वापर करा पण शक्यतो वापर टाळण्याचा प्रयत्न करा.

■आवडणारी पुस्तके वाचा: खरंतर पुस्तकात एकदाचे पूर्णपणे मन गुंतले की, बाहेर काय सुरू आहे याची काही माहिती नसते. तेव्हा मिळालेल्या वेळेचा वापर छान-छान पुस्तके वाचण्यासाठी करा. पुस्तकातील महत्वाच्या गोष्टी नोंद करून ठेवा. आवडणारी पुस्तके पुन्हा पुन्हा वाचा यातून आपण प्रत्येकवेळी काहीतरी नवीन ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल.

■ प्रवास टाळा: या कोरोनामुळे का असेना आपल्याला हे माहिती झालं की, कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा कार्यक्रम, समारंभ संपन्न होऊ शकतात. घरी राहून सुद्धा अनेक कामे केल्या जाऊ शकतात. तेव्हा अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका. स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्या!

■ सकारात्मक राहावे: कोरोनाने सर्वांचे कंबरडे जरी मोडले असेल तरीही एक वाक्य लक्षात ठेवा *”ही वेळ निघून जाईल.”* तेव्हा या गंभीर वातावरणात घाबरून जाऊ नका, मानसिक ताणतणाव वाढू देऊ नका. स्वतःला सुरक्षित ठेऊन सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. नक्कीच ही वेळ सुद्धा निघून जाईल.

■ मानसिक मदत करा: कोरोनामुळे जगात परिस्थितीच अशी आली आहे की, इच्छा असतांना देखील एखाद्याला आपण सहकार्य करू शकत नाही. तेव्हा नाही जमत असेल प्रत्यक्षात भेटणे, मदत करणे तर किमान स्वतः सकारात्मक होऊन समोरच्याला मानसिक समाधान द्यावे. शारीरिक अंतर जरी वाढत गेले तरीही मानसिक अंतर वाढता कामा नये.

शेवटी एकच सांगणं आहे की, कोरोनाची भीती अवश्य बाळगावी जोपर्यत आपण पॉसिटीव्ह येत नाही परंतु एकदा काय आपण पॉसिटीव्ह आलात तर घाबरू नका,हिंमत ठेवा जोपर्यंत आपण पुर्णपणे बरे होत नाही…

सुरज पि. दहागावकर
चंद्रपुर
8698615848

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत राहणे गरजेचे – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर: मागील अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार सोबत राहुन मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासह विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करता आला. याच दरम्याण घुग्घुस नगर परिषद...

ग्रामस्थांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा करा- शिवानी वडेट्टीवार

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदार संघात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी विकासात्मक दूरदृष्टी कोनातून मोठ्या...

अग्निपथ योजने विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन…

चंद्रपूर:- केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.मेहबूब भाई शेख यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आले. सदर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

गोंडपिपरी तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ.. कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

सकमुर गावामध्ये जंगली डुक्करांकडून माणसांवर होत आहेत हल्ले… निवेदन देऊनही वनविभागाचे दुर्लक्ष..

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) गोंडपिपरी: तालुक्यातील सकमुर या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून जंगली डुकराच्या हैदोसामुळे गावातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिता...

गोंडपिपरीत तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ… कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन…

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

अकोल्यातून गडचिरोली जिल्ह्यात नकली नोटा पोहचविण्याचा प्रयत्न

सिरोंचा : झटपट पैसे कमावण्याच्या नादात नकली नोटा चलनात आणण्यासाठी अकोला येथून घेऊन येणाऱ्या तीन आरोपींना तेलंगणातील महादेवपूर पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ पकडले. यातील दोघे तेलंगणातील,...

Recent Comments

Don`t copy text!