Advertisements
Home Breaking News मुलीसह तिच्या प्रियकराला कुऱ्हाडीने सपासप कापले...#असहाय्य आई-बाप खिडकीतून बघत राहिले...

मुलीसह तिच्या प्रियकराला कुऱ्हाडीने सपासप कापले…#असहाय्य आई-बाप खिडकीतून बघत राहिले…

कानपूर – कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी आपल्या भावांसोबत मिळून अल्पवयीन मुलीसह तिच्या प्रियकराला कुऱ्हाडीने घाव घालून ठार केले. अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या हत्येनंतर आरोपी मृतदेहांजवळ बसला आणि पोलीस येण्यापूर्वीच आरोपीचा भाऊ फरार झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

Advertisements

शिव आसरे हा घाटमपूर कोतवाली परिसरातील बिरहिणपूर गावात राहणारा ट्रक चालक आहे. कुटुंबात एक पत्नी आणि चार मुलं होती, ज्यात सपना (१६) नावाची मोठी मुलगी होती. सपनाचे शेजारी राहणारे बैजनाथचा मुलगा कल्लू (१७) याच्याशी प्रेमसंबंध होते. सपना आणि कल्लू एकत्र शाळेत असताना त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरु झाले. सपना आणि कल्लूच्या प्रेमसंबंधांची माहिती दोन्ही कुटुंबांसह गावात चर्चेचा विषय बनली होती. ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक वाद-विवाद झाले होते.

मुलीचे वडील लग्नाच्या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी गेले होते गेल्या गुरुवारी भावाच्या लग्नाला शिवआसरे आपली पत्नी व दोन मुलांसह बांदा येथील बरुआ गावी गेले होते. सपना लहान भावासोबत घरी एकटी होती. शुक्रवारी उशिरा रात्री १ वाजण्याच्या सुमारास कल्लू सपनाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. याची माहिती सपनाच्या काकांना मिळाला. काकांनी मुख्य दरवाजाला कुलूप लावून शिवआसरे यांना याबाबत माहिती दिली .

त्याच दिवशी शिवआसरे म्हणजेच मुलीचे वडील शिवा बांदा येथून भाटमपूरला रवाना झाले. शनिवारी सकाळी शिवआसरे घरी पोचले. आरोपीने आपल्या भाऊ अमसरे व दीपक यांच्यासह मुलगी व तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीने हत्या केली.

कल्लूचे कुटुंब खिडकीतून पाहत राहिले

कल्लू हा कुटूंबातील एकुलता एक मुलगा होता. शिवआसरे हे आपल्या भावांसोबत ही क्रूर घटना घडवून आणत होते. प्रियकराचे आईवडील खिडकीतून असहाय्य होऊन पाहत होते आणि मुलाच्या जीवाची भीक मागत होते. घराला कुलूप असल्याने ते आत जाऊ शकले नाहीत. दोघेही डोळ्यासमोर मारले गेले. घाटमपूर कोतवाल धनेश प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टसाठी पाठवले जात आहेत. गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासह फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक) चंद्रपुर: स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ क्राईस्ट रुग्णालय, चंद्रपुर व सुशीलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालय, पडोली यांच्या संयुक्त विद्यमाने...

राज्यात सर्वाधिक मध्यपी महिला धुळे जिल्ह्यात तर पुरुषामध्ये गडचिरोली जिल्हा पहिल्या स्थानावर

 नागपूर : मद्यपानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. परंतु, मद्यविक्रीतून येणारा महसूल बघता राज्य आणि केंद्र सरकारच मद्य...

स्थानिक प्रशासनाचा तिसरा डोळा उघडेल काय? परिसरातील नागरिकांचा प्रश्न

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक) चंद्रपूर: प्रशासनाने खूप मोठा निधी खर्च करून गुन्हेगारीचा पर्दाफाश करण्याकरिता व तपास यंत्रणेला सोयीचे व्हावे याकरिता जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

महाकाली महोत्सवात सराफा असोशिएशन देणार ८ किलो वजनाची माता महाकाली मातेची चांदीची मुर्ती…#महाकाली महोत्सवाची दुसरी नियोजन बैठक संपन्न…

चंद्रपुर: नवरात्रोत्सवात माता महाकाली महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात चंद्रपूरातील दान दात्यांनी समोर येण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले होते. त्यांच्या आवाहणा...

तालुक्यात ग्रापंचायतींच्या निवडणूका जाहीर होताच ग्रामीण भागात सर्वत्र धावपळ कोन होनार सरपंचपदाचा मानकरी यासाठी लागली चुरस

बळीराम काळे,जिवती जिवती (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील २९ ग्राम पंचायतित सार्वत्रिक निडणुकी कार्यक्रम जाहीर झाला असून,१३ ॲक्टोबर २०२२ ला मतदान होणार आहे. तरी राज्य निवडणुक आयोगाच्या...

स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक) चंद्रपुर: स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ क्राईस्ट रुग्णालय, चंद्रपुर व सुशीलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालय, पडोली यांच्या संयुक्त विद्यमाने...

शब्दांकूर फौंडेशन,चंद्रपूर द्वारा पुरस्कार जाहीर…# पंचायत समिती गोंडपीपरी सभागृहात मान्यवरांच्या हस्ते वितरण…

सुरज पि. दहागावकर (कार्यकारी संपादक) गोंडपिपरी: शब्दांकूर फौंडेशन,चंद्रपूर ही एक नोंदणीकृत सामाजिक संस्था असून ती शैक्षणिक,सामाजिक,साहित्य व क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करते.शब्दांकुर फाउंडेशनतर्फे "ध्यास एक...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!