शौचास गेलेल्या इसमावर रानडुकरांचा हल्ला..इसम गंभीर जखमी..

1112

गोंडपिपरी: तालुक्यातील हिवरा या गावात आज सकाळी गावाजवळील लागलेल्या शेतशिवारात सौचालयास गेलेल्या रामदास पाल यांच्यावर रान डूकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली

गोंडपीपरी तालुक्यातील हिवरा येथे रामदास पाल
सकाळी सात वाजताच्या सुमारास गावालगतच्या शेतशिवारात शौचास गेले असता झुडपात दडून बसलेल्या रानडुकराने अचानक रामदास पाल यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात रामदासच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना आज दिनांक 10 मे रोज सॊमवारला सकाळी सात च्या सुमारास गोंडपीपरी तालुक्यातील हिवरा येथे घडली. रानडुक्कराच्या धडकेने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या पायातून रक्तस्त्राव सुरू झाला असल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे नेण्यात आले आहे.

आज 10 मे रोज सॊमवारला हिवरा येथे रानडुकराच्या हल्ल्यात एक इसम जखमी झाल्याची घटना घडली असल्याने गोंडपीपरी तालुक्यात मानव आणि वन्यजीव संघर्षात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.