कोरोना महामारीत मिठु जोद्दार या मुलीसाठी रेगडी पोलीस कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात… PSI शिंब्रे साहेब यांचे रेगडी गावात कौतुक…

1205

गडचिरोली/चामोर्शी
विदर्भ ब्युरोचीफ प्रशांत शाहा

चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील नक्षल पीडित मुलगी मिठु जोद्दार हिला नोकरीसाठी नाशिक येथील आदिवासी महामंडळ येथे कागदपत्रे सादर करन्यासाठी जाणे अत्यावशक होते. परंतु कोरोना लॉकडॉउन मुळे प्रवास करण्यासाठी तिला e pass ची अत्यंत गरज होती.

तिने बरेच प्रयत्न करून सुद्धा तिला e pass मिळत नव्हता. म्हणून तिने पोलीस मदत केंद्र रेगडी येथे मदत मागितली तेव्हा psi शिंब्रे यानी लगेच मदतीसाठी प्रयत्न केले व सदरची बाब उप विभागीय पोलीस अधीकारी गडचिरोली श्री. प्राणिल गिलडा साहेबांना सांगितली साहेबांनी लगेच मदतीला सुरवात करून e pass काढून दिला.

परंतु मुलीकडे गाडी करण्यासाठी आर्थिक अडचण होती ती psi शिंब्रे. Psi मगरे व स.फोज रमेश कुसराम,पो. हवालदार जयराम तीम्मा,नरेंद्र धोंडणे,शेकलाल मडावी,दीपक पिटाले,नितीन शेरकी, गणेश बोरकुटे,व इतर सर्व कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुलीला नाशिक ला जाण्यासाठी गाडी करण्यासाठी आर्थिक मदत केली तसेच प्रवासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.

पोलिसांनी केलेल्या मदती बद्दल मिठु व तिच्या आईने श्री.dysp गिलडा साहेब,psi शिंब्रे साहेब, मगरे साहेब व पोलीस कर्मचाऱ्यांचे अंतःकरणाने आभार मानले…
यात गाडी मालक श्री उमेश मल्लिक यांनी पण गाडीचे भाडे न घेता फक्त डिझेल खर्च घेऊन मिठु ला मदत केली व इंडिया दस्तक न्युज टीव्ही चे पत्रकार प्रशांत भाऊ शाहा त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेऊन प्रवासात त्याचं जेवणाची सुविधा केली.

यात psi शिंब्रे व पत्रकार मदत करणार आहेत ही माहिती गावात पसरताच रेगडी गावातील नागरिक psi शिंब्रे साहेब व पत्रकार प्रशांत शाहा,समाज सेवक रवी दुधकोहरे व पोलीस प्रशासनाचे कौतुक करत आहेत…