Home चंद्रपूर राजुरा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला राजुरा विधानसभेतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा...#उपजिल्हा रुग्णालय, कोव्हिड...

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला राजुरा विधानसभेतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा…#उपजिल्हा रुग्णालय, कोव्हिड केअर सेंटरला दिली भेट…

राजुरा (ता.प्र) :– पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी उपजिल्हा रुग्णालय राजुरा, कोविड केअर सेंटर समाजकल्याण वसतिगृह राजुरा येथे आज भेट दिली. येथील कोरोना रुग्णांना विचारपूस करून व्यवस्था जाणून घेतली. यानंतर लगेच उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात विधानसभा क्षेत्रातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.
सर्वसामान्य जनता सध्या कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावांने त्रस्त आहे. राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती व गोंडपिपरी या ग्रामीण भागात कोरोना झपाट्याने वाढत असून ऑक्सिजन बेड, रेमिडीसीवर इंजेक्‍शन तसेच अन्य आवश्यक समस्या सोडविण्यासाठी आमदार सुभाष धोटे सतत प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री याबाबत सकारात्मक असून लवकरात लवकर येथे सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रसंगी खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, तहसिलदार हरिष गाडे, तहसिलदार महिंद्र वाकलेकर, तहसिलदार के. डी. मेश्राम, मुख्याधिकारी आर्शीया जुही, डॉ विशाखा शेळकी, सूर्यकांत पिदुरकर, संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, बापुराव पाचपटील, तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश नगराळे, डॉ. डी. पी. चकोले,डॉ. स्वप्नील टेंभे, वैद्यकिय अधिक्षक डॉ. लहू कुलमेथे, डॉ. संदीप बांबोळे, डॉ. गेडाम, डॉ. गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. बावणे, डॉ. अशोक जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, उपविभागीय अभियंता बाजारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, नगर सेवक हरजीत सिंग, नायब तहसीलदार विनोद डोंनगावकर, अमित बनसोडे, अतुल गांगुर्डे आदी आढावा बैठकीत उपस्थित होते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

सिंधी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन…

राकेश कडुकर राजूरा तालुका प्रतिनिधि राजुरा तालुक्यातील सिंधी येथे 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी नवीन ट्यूबवेल व वाल दुरुस्ती, 100% नळ कनेक्शन तसेच मानव विकास...

नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या प्रयत्नांना यश…राजुरा शहरातील नागरिकांना ५९३ घरकुल मंजूर…

राजुरा (ता.प्र) :-- नगर परिषद राजुराद्वारे मागील पाच वर्षापासून लोकहिताच्या अनेक योजनांची अंमलबजावणी प्राधान्याने सुरू आहे. शहरातील गोरगरीब, गरजू लाभार्थींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ...

पत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला

राजुरा: राजुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज संकुल चौकात अज्ञातांकडून दैनिक नवभारतचे तालुका प्रतिनिधी यांच्यावर क्षुल्लक कारणावरून जिवघेणा भ्याड हल्ला करण्यात आला. हि दुर्दैवी घटना...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

बेलतरोडी अग्नितांडवातील पीडितांना 15 ताडपत्री धम्मदान.. ‘द डिवाईन ग्रुप‘चा अभिनव उपक्रम

नागपूर : गेल्या आठवडयात बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सिलिंडरच्या विस्फोटातील भिषण आगीत शेकडो झोपडया भक्ष्यस्थानी झाल्याने हजारो नागरिक उघडयावर पडले. सोमवारी महाकारूणीक तथागत...

नक्षलवाद्याकडून वाहनांची जाळपोळ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यामधल्या हालेवारा पोलीस मदत केंद्रांतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी मवेली ते मोहुर्ली...

तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस ; अनेक घरांची उडाली छपरे…रस्त्यांवरील दुकाने, प्रवासी व शेतकऱ्यांची एकच तारांबळ

बळीराम काळे/जिवती जिवती : रविवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह तालुक्यात पाऊस बरसला. याचा माराई पाटण, टेकामांडवा, हिमायतनगर, शेणगाव, टेकाअर्जुनी, धोंडाअर्जुनी, देवलागुडा, येल्लापूर, पालडोह...

‘त्या’ बातमीचा इम्पॅक्ट ! खेमदेव गरपल्लीवाराना व्यसनमुक्ती केंद्राने केले पाचारण..

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे) ...'खुद्द मद्यविक्रेता व्यसनमुक्तीसाठी धडपडतो तेंव्हा ...' या शीर्षकाची बातमी इंडिया दस्तक न्यूज चॅनेल मध्ये नुकतीच प्रसिद्ध झाली. सदर बातमी अनेक जणांनी वाचली...

Recent Comments

Don`t copy text!