भावपूर्ण श्रद्धांजली! पत्नी ,पुत्री पाठोपाठ प्रा मुकुंद खैरे यांचेही निधन…

1934

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )
काही दिवसापूर्वीच पत्नीचे निधन झाले ,या दुःखात असतानाच मुलगीही कायमची सोडून गेली ,या धक्क्याने पुरते खचलेल्या प्रा मुकुंद खैरे यांनाही काळाने उचलले !अवघ्या 10,15दिवसाच्या अंतराने आई ,वडील ,मुलगी काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .
प्रा मुकुंद खैरे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय ,महत्वाचे कार्यकर्ते होते.सुमारे दहा ,पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या सुविद्य पत्नीचे निधन झाले.
या दुःखात असतांनाच शताब्दी या तरुण , गुणी ,विद्वान ,वकील मुलीचे अकस्मात निधन झाले. त्यांच्यावर अक्षरशा दुःखाचा डोंगर कोसळला.दोन जबरदस्त धक्क्यामुळे ते खचले असणार..! मुलगी गेल्याच्या तीन ,चार दिवसातच त्यांनीही जगाचा निरोप घेतला.
दहा ,पंधरा दिवसाच्या अंतरावर सुशिक्षित ,गुणी ,समाजाला योगदान देणारं कुटुंब पार उध्वस्त झालं !
मानवाधिकार आणि संविधानाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रा मुकुंद खैरे यांनी कितीतरी आंदोलने केलीत.आंबेडकरी चळवळीतील ते महत्वाचे कार्यकर्ते होते.त्यांच्या आणि पत्नी ,मुलीच्या अकस्मात जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.