चंद्रपूर जिल्ह्यात अनेकजण कोरोनाच्या भीतीने अंगावर ताप घेतात शेकून…

737

चंद्रपूर:- सध्या जिल्हातील खेड्यामध्ये तापाची साथ असूनही रुग्ण उपचार करण्यास तयार नाही. कोरोना टेस्ट केली व अहवाल  पाँजिटिव आला तर रुग्णालयात भरती व्हावे लागते. या भीतीने रुग्ण तपासणीकरिता न जाता अंगावर ताप शेकने पसंत करत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे येत्या दिवसात संबधीत गावात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही?

साध्या शिंका यायला सुरुवात झाली तर मनात शंका घर करतात. सर्दी आणि खोकला झाला तर भीतीत भर पडते आणि ताप आला तर कुठेतरी आपण कोणाच्या संपर्कात तर आलो नाही ना, याचा विचार सुरु होतो. याच कारणाने अनेक जण अंगदुखी ताप, सर्दी, खोकला झाला तरी ताप अंगावरच शेकुन काढत आहे. एकीकडे सोशल मिडियापासून कोरोनावर नीट उपचार होत नसल्याची ओरड कोरोना पेंशन्ट कडून होत असल्याने  त्यामुळे स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे वाटुन घरच्या घरी इलाज करत असल्याचे दिसून येते आहे. .