कोरोनाच्या नावाखाली नगर पंचायतीचे लोकसेवेकडे दुर्लक्ष होतेय का? #प्रभारी मुख्याधिकारी विशाखा शेळके आपल्या कर्तव्यावर खऱ्या उतरल्या का.? गोंडपिपरीकरांचा सवाल…

785

नागेश इटेकर/तालुका प्रतिनिधी

गोंडपिपरी :राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट फार भयावह ठरली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण अवघ्या काही मिनिटांवर आले आहे. कोरोना परिस्थीमध्ये राज्यातील शहरी भागात चिंताजनक आणि भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तर ग्रामीण भागातही कोरोना आता हातपाय पसरायला लागला आहे.शहरी भागांत कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीमुळे शासन, प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.राज्य सरकारचे अधिका अधिक लक्ष हे शहरी भागात असल्याचे दिसून येते. तसेच ग्रामीण भागातही कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न होताना दिसत आहे.

गोंडपिपरी शहरात वाढत्या कोरोना संक्रमामुळे नागरीकांना सेवा पुरविण्यात नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होतंय का? करोना परिस्थितीवर काही उपाययोजना राबविल्या जात आहेत का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवत आहे.शहरात कारोणा रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून मृत्यू देखील दर एक दिवसांनी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.अश्यात नगर प्रशासन मात्र विना मास्क फिरणार्यांवर कार्यवाही करतांना दिसत आहे.नगरात एकूण १७ प्रभाग आहेत या सतरा प्रभागात कोरोना चा शिरकाव झाला असून बऱ्याच प्रमाणामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे.अश्यांना गृह विलगिकरण करण्यात आले आहे.पण खास खबरदारी म्हणून संबंधीत परिसर सॅनेटाईझ करायला पाहिजे परंतु नगर प्रशासनाकडून असे होतांना दिसत नसल्याचे बोलल्या जात आहे.

“दो गज दुरी मास्क हे जरुरी” या प्रमाणे सॅनीटाईझर चा वापर करणे हे देखील काळाची गरज आहे.असे तज्ञांचे म्हणणे आहे.मग ज्या परिसरात कोरोना चे रुग्ण आढळले आहे त्या ठिकाणी सॅनीटाईझर चा छिडकाव प्रशासनाने करायला नको का?जेणे करून कोरोना सदृश विषाणू ईतर ठिकाणी पसरणार नाही.या गोष्टीची खबरदारी नगर प्रशासनाने घ्यायला पाहिजे. नगर पंचायत च्या मुख्याधिकारी श्रीमती विशाखा शेळके ह्या नियमित कार्यालयात येत नाही. त्यांचेवर ईतर गावाचा सुद्धा कार्यभार आहे त्यामुळे त्या नियमित सेवा बजावू शकत नाहीत.

गोंडपिपरी नगर पंचायतचा त्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.कोरोणाच्या या संघर्षमय प्रसंगात कायमस्वरूपी अधिकारी असणे गरजेचे आहे. फिफ्टी फिफ्टी वल्यांकडून पाहिजे ती सेवा जनतेला मिळू शकत नाही.म्हणून या ठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी ची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी, कोरोनाच्या संघर्षमय काळात गोर गरीबांच्या मदतीला धाऊन जातांना स्वतः कोरोना बाधित होऊन महिनाभर बिमारीने झुंजत राहीले असे अनेक सामाजिक कार्यकर्ते यांच्या सह स्थानीक शहर वासीयांची एकमुखी मागणी होत आहे.