Homeचंद्रपूरगोंडपिंपरीधामनपेठ जंगल कामगार सह. संस्थेच्या अध्यक्षपदी मंदाताई कुळमेथे...

धामनपेठ जंगल कामगार सह. संस्थेच्या अध्यक्षपदी मंदाताई कुळमेथे…

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) धामनपेठ जंगल कामगार सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सौ मंदाताई दत्तू कुळमेथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संस्थेच्या इतिहासात प्रथमच एक महिला अध्यक्षपदी विराजमान झाली आहे.

काही दिवसापूर्वीच अनेक वर्षापासून अध्यक्ष असलेल्या भाऊजी कुडीराम मडावी यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाला .
दि 16एप्रिल रोजी संस्थेच्या कार्यालयात नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली.सहाय्यक निबंधक कार्यालयातील दडमल या अध्यासी अधिकारी होत्या.
सदर बैठकीत सौ मंदाताई दत्तू कुळमेथे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.संस्थेचे संचालक या बैठकीला उपस्थित होते.
अडीचशेच्या वर सभासदसंख्या असलेली तालुक्यातील ही सर्वात मोठी सहकारी संस्था समजली जाते.संस्थेच्या दीर्घ इतिहासात एका महिलेला प्रथमच अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे तालुक्यातील सभासदांनी आनंद व्यक्त केला आहे.
अनेक वर्षापासून अध्यक्षपदावर ठाण मांडून बसलेल्या निष्क्रिय अध्यक्षाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करणे,तो पारित करणे,आणि नवा अध्यक्ष बसवणे या साऱ्या घडामोडीत सामाजिक ,राजकीय कार्यकर्ते खेमचंद गरपल्लीवार हेच पडद्यामागील सूत्रधार होते.
सुमारे 25वर्षापासून संस्थेच्या सचिवपदावर चिटकून बसलेल्या,संस्थेच्या नावावर ‘मलिंदा’ खाणाऱ्या आणि आता वयोवृद्ध झालेल्या सचिवाची लवकरच उचलबांगडी करणार असल्याचे संस्थेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!