आणि तहसीलदार के. डी.मेश्राम यांच्या पुढाकाराने ते कोरोना बाधित पोहचले गावी…

0
1191

नागेश इटेकर/ तालुका प्रतिनिधी

Advertisements

गोंडपिपरी:- कोराना च्या पाश्र्वरभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात नागरिकांच्या आरोग्याच्या निगडित समस्यांमध्ये मोठी वाढ झाली असुन, मानसिक दृष्ट्या आरोग्याकडे केलेल्या दुर्लक्षाची मोठी किंमत मोजावी लागेल अशी भीती तज्ञ व्यक्त करत असताना आज दिनांक १०/४/२०२१ रोजी तालुक्यातील चेक बोरगाव येथील रहिवाशी सिंधुबाई राऊत ( वय ६५ वर्ष ) या वृद्ध महिलेचा उपचारासाठी म्हणून स्थानीक ग्रामीण रुग्णालयात दाखल करताच मृत्यू झाला.

Advertisements

मृत्यू पश्चात तिचे कोरोना संबंधी तपासणी केले असता रिपोर्ट positive निघाले.तिच्यासोबत असणारे अन्य दोघांची चाचणी केली असता ते सुद्धा कारोना बाधित निघाले.पुंडलिक बोरकुटे वय(६५) वर्ष,सरिता राऊत वय (३५) वर्ष दोघे हि राहणार चेक बोरगाव अशी बाधितांची नावे असुन त्यांना डॉक्टरांकडून पाहिजे ती सुविधा आणि मदत मिळाली नाही. अशी लाजिरवाणी बाब त्यांचे कडून समोर आली आहे.

कोरोना ग्रस्त रुग्णाला अंतिम संस्कारासाठी परिवाराकडे सुपूर्द करण्यात येत नाही.आरोग्य प्रशासनच त्या मृत देहाची विल्हेवाट लावतात.ही गोष्ट तिथं पर्यंत ठिक आहे पण सोबत असणारे मयत महिलेचे नातलग बाधित निघाले असता त्यांना डॉक्टरांनी वाऱ्यावर सोडले कसे..? या मागील कारण गुलदस्त्यात आहे.

रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वाचून सांगीतले.त्यानंतर त्यांचे काय कर्तव्य होते..? रुग्णालयात दुपारपर्यंत उपाशी पोटी चाचपळत ठेवले.त्यांना वाहनाची घरपोच सेवा न देता आणि गृहविलगिकरणा संबंधी कुठलीही माहिती न देता त्यांना घरी जाण्यास सांगितले.आणि डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार दोघे ही भर दुपारी रुग्णालयातून पायदळ रखरखत्या उन्हात गावाकडे निघाले,रुग्णालयातून काही अंतर जाताच प्राची गॅस एजन्सी जवळ भोवळ येऊन पडले.

दरम्यान मार्ग क्रम करत असलेले सामाजीक कार्यकर्ते साईनाथ मास्टे आणि माजी नगर अध्यक्ष संजय झाडे यांच्या दृष्टीक्षेपात येताच त्यांच्या मदतीला धावून गेले.उन्हातून उचलून सावलीच्या ठिकाणी आणले,भुकेने आणि तहानेने व्याकुळ दिसले दरम्यान पाणी पाजले आणि सर्व काही मंगल झाल्या नंतर त्यांना विचारणा केली.दोघांनीही घडलेला प्रकार सांगितला प्रकरण ऐकून लगेच साईनाथ मास्टे यांनी तहसीलदार श्री के. डी.मेश्राम यांना दूरध्वनी वरुन संपर्क साधला आणि संबंधीत प्रकरणाची माहिती दिली.

साईनाथ मास्टे यांच्या माहितीला गांभीर्याने घेत तहसीलदार यांनी तात्काळ घटनास्थळावर येऊन पोहोचले.प्रकरण जाणुन घेऊन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यां कडून चौकशी केली असता त्यांच्या तर्फे उडवाउडवीची उत्तरे मिळाली.माहितीमध्ये डॉक्टरांनीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला लागले.

तहसीलदार मेश्राम यांना सगळा प्रकार समजला पण वेळेला महत्व देत,कुणालाही दोष न देता स्वतः पुढाकार घेऊन त्या दोघांना आपल्या गाडीत गावापर्यंत सोडून दिले.रुग्णांची ज्यांच्यावर जिम्मेदारी आहे तेच जर अश्या निष्काळजी पनाने वागत असतील तर अपेक्षा तरी कुणा कडून करायची.

रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध असताना रुग्णांना मोफत घर पोच सेवा मिळत नसेल तर काय फायदा त्या रुग्णवाहिकेचा आणि कोरोना बाधीत रुग्णाला असे रस्त्यावर सोडले जातात का.? असा सवाल साईनाथ मास्टे आणि संजय झाडे यांनी आरोग्य प्रशासनाला केला आहे.

संकट समयी जो कामास येतो तो खरा देव”, आणि तो देव तेथे खऱ्या अर्थानी तहसीलदार मेश्राम यांच्या रूपात दिसला.दोघेही कोरोना बाधित असल्याचे माहीत असून देखील स्वतःची पर्वा न करता तिथे जाऊन त्यांची समस्या जाणुन घेतली आणि गावा पर्यंत पोहचविण्याची जिम्मेदारी घेतली.खरोखरच त्यांची ही कामगिरी प्रशंसनीय आहे.सर्व सामन्यासाठी धाऊन येणारा देव माणूस गोंडपिपरी तालुक्याला तहसीलदार म्हणून लाभले हे भाग्याची गोष्ट आहे.

त्याच प्रमाणे कोरोनाच्या पाश्र्वरभूमिवर सामजिक दायित्व जोपासरे साईनाथ मास्टे आणि संजय झाडे हे मागील काळात सुद्धा गरजूंना निस्वार्थपणे अन्न धान्य तसेच जिवणापयोगिक वस्तू पुरविण्याचे कार्य केले.त्यांचे कार्य अविरत असून सामजिक कार्यात त्यांची अतुलनीय कामगिरी आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here