Homeचंद्रपूरदिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : चंद्रपूर जिल्हयात वनकर्मचारी संघटनाचे निदर्शने

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : चंद्रपूर जिल्हयात वनकर्मचारी संघटनाचे निदर्शने

चंद्रपूर: आज चंद्रपूर वनवृत्त अंतर्गत येणारे वनकर्मचारी-अधिकारी वर्गाची संवर्ग निहाय वेगवेगळया संघटनेचे पदाधिकारी एकत्रीत येत सर्व संघटना तर्फे प्रतीनीधीनी मुख्य वनंसरक्षक व जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनाला निवेदने पाठविण्यात आली. तत्पुर्वी प्रत्येक संघटनाच्या प्रतिनीधीनी एकत्रीत येत हातात बॅनर घेउन घटनेचा जाहीर निषेध करीत कार्यवाहीची मागणी केली.

यांसदर्भात नुकतेच चंद्रपूर वनवृत्तातील विवीध संघटनेच्या प्रतिनीधीची बैठक पार पडली होती. या बैठकीत स्व. दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण व यास कारणीभुत बाबी यावर चर्चा करण्यात आली. उपस्थित विवीध संघटनेचे पदाधिकारी यांनी आपली मते मांडली. या बैठकीत दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभुत असलेले वरिष्ठ वनाधिकारी यांचेवर कठोर कार्यवाही तसेच उच्चस्तरीय चैकशी करीता एसआयटी गठीत करण्याची मागणीवर सर्वाचे एकमत झाले. बैठकीच्या अखेरीस स्व. दिपाली चव्हाण यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. सर्व संघटना मिळुन शासनास वेगवेगळे निवेदन पाठवण्यासंदर्भात व निदर्शने करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रीत महासंघाचे राज्य संघटक अरूण तिखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत, महाराष्ट्र स्टेट गॅजेटेड फाॅरेस्ट आॅफीसर्स असो. चे विभागीय वनाधिकारी राम धोतरे, सारीका जगताप, एस एस करे, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अॅड रमेश पिपंळशेडे, दीपक जेऊरकर, संतोष अतकरे, राजपत्रीत महासंघाच्या राज्य महीला सरचिटनीस डाॅ सुचिता धांडे, डाॅ अविनाश सोमनाथे, अशोक मातकर, जिल्हा परिषदेचे कॅफो, फाॅरेस्ट रेंजर्स असोशिएशनचे अध्यक्ष आरएफओ भाउराव तुपे, आरएफओ संतोष थिपे, राहूल कारेकर, आॅल इंडीया रेंज फाॅरेस्ट असोशिएशनच्या स्वाती महेशकर, एसटीपीएफच्या आरएफओ जाधव, आरएफओ दीपिका गेडाम, आरएफओ आर के पाटील, महाराष्ट्र वन व सामाजिक वनिकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश कोमलवार, सहसचिव संजय मैंद, सचिन साळवे, अखिल राईचवार, वनरक्षक वनपाल संघटनेचे प्रदिप कोडापे, राजेश पिंपळकर, विलास कोसनकर, वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटनेचे विजय रामटेके, भारत मडावी, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी कर्मचारी संघटनचे महासचिव आरपी बलय्या, महाराष्ट्र वन सेवानिवृत्त पेन्शनर्स असोशिएशन कालीदास निमगडे, श्री एबी वाटेकर, श्री राऊतकर, महाराष्ट्र राज्य शासकीय-निम शासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक संघटनेचे दिपक हिवरे, नरेंद्र सीडाम, महाराष्ट्र राज्य वन कर्मचारी व वनमजूर संघटना बंडू देशमुख, महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी वनकर्मचारी संघटना जयप्रकाश द्विवेदी, महिला कर्मचारी सौ लीना जांभुलकर, सौ प्रीती मुधोळकर, सौ वैशाली काळे, इको-प्रो चे बंडु धोतरे, नितीन रामटेके, नितीन बुरडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यात चंद्रपूर जिल्हयातील संवर्ग निहाय वनकर्मवारी संघटनाचा सहभाग होता आज ठरल्याप्रमाणे सर्व संघटनेचे 2-4 प्रतीनीधीनी एकत्रीत येत मुख्य वनंसरक्षक कार्यालय, चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर समोर निदर्शने केलीत.

वनविभागाच्या संवर्गनिहाय सहभागी संघटना
महाराष्ट्र राज्य राजपत्रीत अधिकारी महासंघ, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र स्टेट गॅजेटेड फाॅरेस्ट आॅफीसर्स असोशिएशन, आॅल इंडीया रेंज फाॅरेस्ट आॅफिसर्स फेडरेशन, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शाखा चंद्रपूर, फाॅरेस्ट रेंजर्स असोशिएशन महाराष्ट्र, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र वन व सामाजिक वनिकरण कार्यालयीन कर्मचारी संघटना, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटना, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी कर्मचारी संघटना, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र वन सेवानिवृत्त पेन्शनर्स असोशिएशन चंद्रपूर वनवृत्त, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य शासकीय-निम शासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक संघटना, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य वन कर्मचारी व वनमजूर संघटना, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी वनकर्मचारी संघटना, शाखा चंद्रपूर, इको-प्रो संस्था, चंद्रपूर

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!