Home Breaking News वाघाच्या हल्ल्यात काका-पुतण्या ठार…#सिंदेवाही तालुक्यातील घटना…

वाघाच्या हल्ल्यात काका-पुतण्या ठार…#सिंदेवाही तालुक्यातील घटना…

0
1405
Advertisements
    सिंदेवाही: तालुक्यातील पवनपार येथिल जंगलात मोहफुल वेचायला गेलेल्या मजुरांवर झालेल्या वाघाच्या हल्ल्यात काका पुतण्या ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली.
कमलाकर ऋषी उंदिरवाडे व द्रुवास उंदिरवाडे असे मृतकाचे नाव आहे. ही व्यक्ती आज दि 6 एप्रिल ला सकाळी मोहफुल वेचण्यांसाठी गेलेे होते. ही घटना एकाच ठिकाणी घडलेली आहे. सध्या मोहफुल वेचणीचा हंगाम आहे परंतु वाघाचीही दहशत असल्याने वन विभागाकडून वारंवार जनजागृती करीत असतानाही जीव धोक्यात घालून मजूर मोहफुल वेचायला जात असल्याने वन्य जीव मानव संघर्ष वाढत असल्यान जनतेत भीतीचे वातावरण झाले आहे.

वाघच्या हल्यात अनेक कुटुंब उध्वस्त होत आहे,मात्र वन विभाग या बाबिकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. घरचा कमावता गेल्याने उन्दिरवाड़े कुटुंबावर मोठे संकट आले आहे,वन विभागनी मदत करावी .

 

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!