रमेश बुरबुरे यांच्या बहुचर्चित “सूर्या तुझ्या दिशेने” या गझल संग्रहाचे डिजिटल विमोचन…

419

घाटंजी तालुक्यातील निंबर्डा या छोट्याश्या गावातील रमेश बुरबुरे यांचा बहुप्रतिक्षित ‘सूर्या तुझ्या दिशेने…’ या गझलसंग्रहाचे १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता झूम ऍप वर ऑनलाईन विमोचन होणार आहे. यापूर्वी गझलकार रमेश बुरबुरे यांचा अस्वस्थ वर्तमानाचे संदर्भ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून त्यासाठी त्यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा दीन मित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवांकित करण्यात आले आहे.
रानभरारी गझलमंच तथा पालवी काव्यमंच यवतमाळ तर्फे आयोजित या डिजिटल विमोचनाचे समारंभाध्यक्ष सुप्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक/नाटककार/समीक्षक प्रा. विलास भवरे राहणार असून समता सैनिक दल महिला विंगच्या महाराष्ट्र राज्यातील कुशल संगठक मा. पुनम डॉ सूरज ढाले यांच्या हस्ते सूर्या तुझ्या दिशेने या गझल संग्रहाचे विमोचन होणार आहे. गझल भाष्यकार गझलकार संदीप वाकोडे, तर अशोक भगत, अशोक बुरबुरे, डॉ.अशोक पळवेकर, संजय ओरके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारंभाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका स्नेहल सोनटक्के तर आभार प्रदर्शन सुपरिचित व्याख्याते मॅझिनी बायदाणी करतील.
प्रकाशन सोहळ्यानंतर लगेचच ज्येष्ठ गझलकार विद्यानंद हाडके यांच्या अध्यक्ष्यातेखाली गझल मुशायरा संपन्न होणार असून त्याचे सूत्र संचालन ख्यातनाम निवेदक मंगेश जनबंधू तर आभार प्रदर्शन आनंद देवगडे करणार आहेत. अशी माहिती रानभरारी गझलमंचाकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.