अडेगाव मध्ये नाल्यांची स्वच्छता…

770

शरद कुकुडकर (प्रतिनिधी)

गोंडपिपरी: जगात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आरोग्याची काळजी घेण्यासाठी गोंडपीपरी तालुक्यातील अडेगांव येथे नाली फवारणी करण्यात आली आहे. पुढे हफ्तातून एक वेळा फवारणी केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच रेखाताई चौधरी, उपसरपंच विजयभाऊ चौधरी सदस्य कुसुमताई सातपूते, संतोष कोवे, समाज कार्यकर्ता संतोष सातपूते, पोलिस पाटील दामोधर राऊत, विठ्ठल पिपरे, विनोद झाडे विश्वनाथ ध्यार, संदिप नागापूरे, शिपाई श्रावण रायपूरे तथा नागरिक हजर होते…