ब्रेकिंग न्यूज! चंदनखेडी मारखंडा रोडवर पिकअप-बसचा भीषण अपघात…

6111

आष्टी-आलापल्ली रोडवरील चंदनखेडी जवळ झालेल्या पिकअप-बस भीषण अपघातात पिकअप मध्ये असलेल्या चालकासह चार मजुरांचा मृत्यू झाला असून १० मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या तेलंगाणा मध्ये महाराष्ट्रातील अनेक मजूर मिरची तोडण्यासाठी गेले आहेत. हा हंगाम संपला असून आता होळी सणानिमित्त मजूर स्वगावी परत येत आहेत.

अश्यातच आज TS04 UD 5840 या पिकअप मजुरांना घेऊन स्वगावी येत होती. या पिकअला MH40 Y5601 या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस ची जोरदार धडक बसली. यात काही मजुरांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे होळीचा दिवशी मिर्ची तोडणी मजुरांवर काळाचा घातला.

सविस्तर माहिती थोड्या वेळात