पोंभुर्णा: वनपरिक्षेत्र पोंभुर्णा येथे येत असलेल्या जंगलालगत असलेल्या तलावात स्वतःच्या गाई पाणी पाजण्यासाठी नेले असता दडी मारून बसलेल्या वाघाने एका इसमावर हल्ला करून ठार केले…
ही घटना काल सायंकाळी ६ वाजता घडली असून या हल्ल्यात पुरूषोत्तम उध्दव मडावी (५५ वर्षे)मु चेक आष्टा ता पोंभूर्णा हे ठार झाले आहेत. त्यांच्या मागे एक मूलगा एक मूलगी आणी पत्नी असा आप्त परीवार आहे.
शव प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णी इथे शवविच्छेदन साठी आणले असून पुढील तपास वनविभाग पोंभूर्णा करीत आहे…
Advertisements