समाज समता संघाची आढावा बैठक मुंबई येथे संपन्न…

0
210

मुंबई: समाज समता संघ, मुंबई प्रदेश प्रमुख कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य पदाधिकारी याची आढावा बैठक काल 04/03/2021 रोजी शालवन बुद्ध विहार, सेक्टर नंबर 1 सी जी एस कॉलनी. काणे नगर, मुंबई येथे पार पडली.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त IAS अधिकारी, समाज समता संघाचे केंद्रीय अध्यक्ष मा. किशोर गजभिये सर उपस्थित होते. संघटन वाढीसाठी प्रत्येक सदस्याने प्रयत्न केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. सोबतच समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी समाज समता संघाचे कार्यकर्ते प्रयत्नशील असावे असे सांगितले.

शिवशक्ती-भीमशक्तीच्या असंख्य कार्यकर्त्यानी समाज समता संघात प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मा रतन निर्भवने मुंबई सभासद यांनी केले.

या कार्यक्रमाला मा. राहुल गरुड (महाराष्ट्र अध्यक्ष), मा. अजित मगरे (मुंबई अध्यक्ष), मा. विश्वास गायकवाड (मुंबईसरचिटणीस), दादा निकाळजे(महाराष्ट्र कार्याध्यक्ष), मा. अॅड विकास शिवगण (मुंबई सभासद), मा. नंदकुमार अहिरे ( मुंबई संघटक), मा. सुभाष दाभाडे ( मुंबई संघटक), मा. मिरज अन्सारी ( जिल्हा अध्यक्ष), मा. रतन निभवणे, मा अतिश गांगुर्डे तसेच मुंबई प्रमुख कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here