चंद्रपूर, दि. 4 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 70 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 873 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 40 झाली आहे. सध्या 434 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 18 हजार 284 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 92 हजार 331 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 399 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 360, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 70 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 20, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपूर सहा, सिंदेवाही दोन, मूल 10, राजूरा तीन, वरोरा 26, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
चंद्रपुरकरांनो सावधान! कोरोना वाढतोय…गत 24 तासात 14 कोरोनामुक्त ; 70 पॉझिटिव्ह…
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements