वरोऱ्यात विजेच्या धक्क्याने कामगाराचा होरपडून मृत्यू

0
631

वरोरा: काल दि. २४ सकाळी वरोरा तालुक्यातील आनंद निकेतन महाविद्यालय समोरील बोर्डा येथील विकास नगर भागातील विजेच्या खांबावर दुरुस्ती चे काम करतांना विजेचा जोरदार शॉक लागून कामगाराचा होरपडून मृत्यू झाला.

मृतकाचे नाव राजू काशीनाथ भोयर वय 30 असून तो चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथील रहिवासी असून तो फुकट नगर येथे रहात होता. मृतक हा नागपूर येथील कंत्राटदार कडे काम करत होता. दुर्घटनेनंतर काही वेळ संपूर्ण वीज पुरवठा खंडित करून मृतकाला पोल वरून उतरवून शवविच्छेदना साठी शव वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी पुढील तपास सुरूचं होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here