कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा संचालक मंडळ बरखास्त करून कर्मचाऱ्यांना पुर्वरत कामावर रुजू करा…

0
202

पोंभुर्णा :- कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभूर्णा येथे मागील अनेक वर्षांपासून कामावर असलेल्या कामगारांना बंद केल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.त्या कामगारांना पुर्वरत कामावर घेण्यात यावे व पोंभुर्णा प्रशासन संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करण्यात यावे अशी मागणी कामगारांनी जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
मागील १० वर्षांपासून पोंभुर्णा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ११ कामगार रोजंदारी कामगार म्हणून काम करीत आहेत. कोरोना काळात सदर कामगार प्रामाणिक पणे व चिकाटीने काम केले आहेत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती च्या उन्नती साठी विषेश कामगीरी बजावली आहे तत्कालीन सचिव व संचालकांनी दिलेल्या सुचना व आदेशानुसार सर्व कामगार निष्ठेने काम करून कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा चा नावलौकिक केला आहे कोरोणा काळात शेतकरी या प्रादुर्भावापासुर अलिप्त रहावे म्हणून उत्तमरीत्या कर्तव्य बजावले आहे. तरीही नवीन संचालक मंडळ यांनी काही कामगार ठेवुन सहा कामगारांना कामावरून काढून टाकले आहे.याला सर्वस्वी संचालक मंडळ जबाबदार असुन मुख्य प्रशासक असलेल्या कवडु कुंदावार एका राष्ट्रीय पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत ते बोगस संचालक असुन ते बाजार समिती चे कोणतेही सभासद नाही त्यांनी शासनाला खोटे व बनावट दस्तऐवज सादर करुन शासनाची फसवणूक केली आहे तसेच त्यावर मध्यवर्ती बॅंकेचे लाखो कर्ज बुडविले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नौकरी लाऊन देतो म्हणून अनेक बेरोजगारांना गंडा घातला आहे सतत पैशाची मागणी केल्याने ते न दिल्याने रोजंदारी कामगार यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.तसेच यांनी सुध्दा खोटे प्रमाणपत्र सादर करुन संचालक पदावर नियुक्ती केली आहे.या तिघांचेही पद बेकायदेशीर आहे त्यांना तत्काळ पदावरून दूर करुन आम्हाला पुर्वरत कामावर घेण्यात यावे अशी मागणी कामगारांनी निवेदनातून केली आहे.जर येत्या सात दिवसांत कामावर घेतले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा हि दिला आहे.निवेदन देताना किशोर अर्जुनकार,संतुल बोलमवार, दुर्वास कन्नाके, सचिन पोतराजे, अविनाश पद्मगीरीवार, संतोष तेलसे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here