HomeBreaking Newsगडचिरोली येथे २२ फेब्रुवारी २०२१ ला ओबीसीचा भव्य मोर्चा...

गडचिरोली येथे २२ फेब्रुवारी २०२१ ला ओबीसीचा भव्य मोर्चा…

नितेश खडसे जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली: स्वतंत्र भारतात आजपर्यंत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली नाही. त्यामुळे ओबीसींची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगती खुंटली आहे. 2021 मध्ये होणार्‍या जनगणनेत एससी, एसटीप्रमाणे ओबीसींची जातीनिहाय जनगणना केली जावी व जनगणना प्रपत्रात ओबीसींचा स्वतंत्र रकाना तयार करण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी ओबीसी समाज गडचिरोली येथे 22 फेब्रुवारी ला एक लाख लोकांच्या विशाल मोर्चाद्वारे आपला सामाजिक हुंंकार भरणार आहे.

ओबीसी समाज संघटनेने “अभी नही तो कभी नही” असा निर्धार यावेळी व्यक्त केला. काल 1 फेब्रुवारी रोज सोमवरला सायंकाळी 6 वाजता ओबीसी समाज संघटनेची सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध  विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी आरक्षणात मराठा समाजासह इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये.

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदुरबार, ठाणे, पालघर, जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पुर्ववत करणे, एससी एसटी समाजप्रमाणे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमासाठी 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी या प्रमुख मागण्यासह इतर मागण्या वर चर्चा करण्यात आली. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करून देणे, इतर विषयावर चर्चा करण्यात आली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!