विजय फाऊंडेशन चंद्रपूर तर्फे चंद्रपूर पोलीस दलातील वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांचा सन्मान….

388

विजय फाऊंडेशन चंद्रपूर तर्फे ,चंद्रपूर पोलीस दलातील वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना फराळ वाटप करून त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदनपर आभार व्यक्त करण्यात आले .भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देत पोलीस दलाचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच सामान्य जनता दिवाळी साजरी करीत आहे आणि पोलीस खाते त्यांचे रक्षण, म्हनून “विजय फाऊंडेशन “, तर्फे त्यांना सलाम…

या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेड चे विद्यार्थी आघाडी शहर प्रमुख आणि विजय फाऊंडेशन चे अध्यक्ष/संचालक अजय लहानुजी दुर्गे (अलद.),भीमशक्तीचे उपाध्यक्ष आणि अल्पसंख्याक समाजाचे अध्यक्ष मझहर बेग ,अध्यक्ष कुणाला उराडे , महासचिव स्वप्नील तेलसे,उपाध्यक्ष आणि यंग चांदा ब्रिगेड चे सदस्य पवन वाकडे , लकी पिंपळे,संदेश भाले, पंकज धोटे ,महिला पदाधिकारी रचना धोटे मॅडम, समीक्षा आसेकर मॅडम,प्रगती चुणारकर मॅडम ,स्वाती मेश्राम मॅडम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.