गडचिरोली नगर परिषद ने विसापूर येथील तीन एकर जमीन आपल्या ताब्यात घ्यावी आमदार डॉ देवराव होळी

589

 

गडचिरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

विसापूर येथील तीन एकर शेत गेल्या कित्येक वर्षांपासून पडीत आहे.
सदर शेत जमीनिवर गावातील काही विघ्न संतोषी नुकताच या जागेवर येथील लोकांनी अतिक्रमण करण्याचा सपाटा सुरू केला आहे त्यामुळे सदर जमीन कोणत्याही कामास लागणार नाही व या जागेचा गैरवापर करून येथील अतिक्रमण धारक भविष्यात सदर जागा विकून टाकतील व या जागेचा दुरुपयोग होईल परंतु सदर जागा नगर परिषद प्रशासनाने आपल्या ताब्यात घेऊन या जागेचा सर्वसामान्य जनतेच्या कामी लावावी अशी मागणी येथील शेजारच्या शेतकऱ्यांनी व विसापूर येथील नागरिकांनी आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्याकडे केली आहे.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती विलास पाटील दशमुखे ,भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली तालुका अध्यक्ष रमरतन गोहणे ,भारतीय जनता पक्षाचे तालुका महामंत्री हेमंत पाटील बोरकुटे व भाजप बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शाहा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.