सोशल मीडिया यंग ब्रिगेड तालुका प्रमुखपदी गौरव घुबडे यांची निवड

504

 

गोंडपिपरी / शेखर बोनगिरवार

गोंडपीपरी तालुक्यातील प्रत्येक गावची समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न यंग ब्रिगेड गोंडपीपरी च्या माध्यमातून होणार आहे. त्याकरीता तालुक्यातील गावागावात यंग ब्रिगेड शाखा स्थापन करण्यात येत आहेत, अश्यातच आज गोंडपीपरी तालुक्यातिल सकमुर येथील येथील युवा तडफदार नेतृत्व गौरव घुबडे यांची तालुका अध्यक्ष सोशल मीडिया यंग ब्रिगेड गोंडपीपरी पदी निवड करण्यात आली नियुक्ती पत्र आज देण्यात आले.

इतिहास अभ्यासक निलेश झाडे यांच्या हस्ते गौरव घुबडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी यंग ब्रिगेटचे संस्थापक अध्यक्ष सूरज माडूरवार उपस्थित होते.गोंडपिपरी यंग ब्रिगेटचा माध्यमातून गोंडपिपरी तालुक्यातील अनेक समस्यांना वाचा फोडली जात आहे.अल्पावधितच ही संघटना लोकप्रिय झाली.तालुक्यातील तरूणांचा ओढा यंग ब्रिगेटकडे वढला आहे.

गोंडपीपरी तालुक्यातील निर्ढावलेले प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचे समस्याकडे लक्ष्य वेधण्यासाठी हे व्यासपीठ काम करणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुरज माडुरवार यांनी दिली