काळ्या कायद्याचा विरोधात काँग्रेसची ऐतिहासिक शेतकरी बचाव रॕली उद्याला

0
185

 

चंद्रपूर

केंद्र सरकारने घाईघाईने तिन शेतकरी विरोधक कायदे मंजूर केले. हे तिन्ही कायदे शेतकरी बांधवासाठी मारक ठरणारे आहेत. काँग्रेस पक्षाकडून या कायद्यांचा विरोधात राज्यभर आंदोलने सूरू आहेत. उद्याला ( गुरूवारला ) राज्यभरातील दहा हजार गावात ऐतिहासिक शेतकरी बचाव रॕलीचे आयोजन करण्यात आले आहे.यात 50 लाख शेतकरी बांधव समावेश होणार आहे.काही ठिकाणी प्रत्यक्ष सभा होणार असून,समाजमाध्यमाचा माध्यमातून शेतकरी सहभाग घेणार आहेत.

केंद्र सरकारने घाईघाईने तिन शेतकरी कायदे मंजूर केले.काँग्रेस पक्षाने या कायद्यांचा ” काळे कायदे ” असा उल्लेख केला आहे.या कयद्यांचा विरोधात काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात आंदोलने सूरू केली आहेत.आता 15 आक्टोंबरला 4 वाजता पक्षाने शेतकरी बचाव व्हर्चुअल रॕलीचे आयोजन केले आहे.या रॕलीचे दहा हजार गावात ऐकाचवेळी आयोजन केले जाणार आहे.सोशल मिडीयावर ही रॕली सर्वांना पाहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.अशी माहीती किशोर गजभिये, महासचिव , अखिल भारतीय काँग्रेस पार्टी तथा चंद्रपूर जिल्हा प्रभारी,संजय देवतळे,राजेश अड्डू यांनी चंद्रपूर येथे झालेल्या पत्रकारपरिषदेत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here