गोंडपिपरी तालुक्यात रेती जोरात

601

 

गोंडपिपरी / शेखर बोनगिरवार

गोंडपिपरी तालुक्यात रेती तस्करीला उधान आले आहे. रेती घाट बंद असल्याने रेतीला सोन्याचे भाव मिळत आहे.चोरीचा रेतीतून शासकीय कामे सूरू आहेत.दूसरीकडे घरकुलचे बांधकाम मात्र रेती अभावी रखळले आहेत. रेतीतून मिळणारा मोठा नफा बघता अनेकांनी रेती तस्करी सूरू केली.दिवसाढवळ्या रेतीची तस्करी सूरू असतांना महसूल विभागाने डोळे बंद केले आहेत. त्यामुळे रेती चोर आणि महसूल विभागाचा गोड सबंधाची ” अर्थ ” पुर्ण चर्चा तालुक्यात सूरू आहे.

पर्यावरण विभागाने घेतलेल्या भूमिकेमुळे शासन स्तरावरून रेतीघाटांचे लिलाव प्रक्रिया रखडली आहे.याचा थेट परिणाम इमारत बांधकामावर होतांना दिसत आहे. चोरी केलेल्या रेतीचा वापरातून अनेक शासकीय इमारतीचे बांधकाम सूरू आहेत.गोंडपिपरी शहरासह ग्रामीण भागात दिवस,रात्र तस्करांकडून रेतीचे उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असतांना महसूल विभागाने डोळे बंद केल्याने चर्चेला उधान आले आहे. शासकीय इमारतीचे बांधकामे सूरू असतांना घरकुलचे बांधकाम रेती अभावी रखडली आहेत.सामान्य माणसांना कायद्याचा धाक दाखविणारे रेती तस्करांना मात्र रान मोकळे केले असल्याचे चित्र तालुक्यात आहे.