Home Breaking News हाथरस प्रकरणातील नराधमांना फाशी द्या ;गोंडपिपरी कांग्रेस कमेटी अनु.जाती विभागाची मागणी

हाथरस प्रकरणातील नराधमांना फाशी द्या ;गोंडपिपरी कांग्रेस कमेटी अनु.जाती विभागाची मागणी

431

गोंडपिपरी / शेखर बोनगिरवार

उत्तर प्रदेशातील गाव भूलगडी जि. हाथरस येथील विद्यार्थिनी मनीषा वाल्मिकी हिचेवर नराधमांनी अत्याचार करून तिची जीभ कापली व खून केला. परंतु उत्तर प्रदेश सरकार सदर प्रकरण दाबण्याच्या तयारीत असून गुन्हेगाराना पाठीशी घालत आहे. याचा तीव्र निषेध करून आरोपींना फाशी देण्यात यावी. व उत्तर प्रदेशातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करावे,अशी मागणी करणारे निवेदन गोंडपिपरी काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने येथील तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
लोकशाही प्रधान देशात दलितांवर होणारे अत्याचार दिवसागणिक वाढत आहेत. यावर ठोस निर्णय घेण्यात यावा व जलद गती न्यायालयात सदर खटला चालवून आरोपींना फाशी ची शिक्षा ठोठावन्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी गौतम झाडे तालुकाध्यक्ष कांग्रेस कमेटी अनु.जाती, कमलेश निमगडे जिल्हा सचिव काँग्रेस कमिटी, सचिन फुलझेले, शाहीराज अलोणे, नवराज चंद्रागडे, ताराचंद झाडे, प्रवीण भसारकर, प्रफुल रामटेके आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Don`t copy text!