वाघाचा हल्यात शेतकरी ठार ; राजूरा तालुक्यातील नऊ लोकांचा गेला बळी

431

चंद्रपूर / कैलास दूर्योधन

राजूरा वनपरिक्षेत्रातील खांबाला नियत क्षेत्रात वाघाचा हल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना उघळकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मारोती पेंन्दोर असे मृतकाचे नाव आहे. वाघाचा हल्यात तालुक्यात आतापर्यंत नऊ लोकांचा बळी गेला आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सूरू आहेत. मात्र प्रत्येक वेळी वाघ हूलकावणी देत आहे. सतत होणाऱ्या हल्यामुळे तालुक्यात दहशत पसरली आहे.

राजूरा तालुक्यातील खांबाला येथिल शेतकरी मारोती पेंदोर यांचे शेत जंगलालगत आहे. 5 आक्टोंबरला पेंदोर शेतात गेले होते.परंतू रात्रौ झाली मात्र पेंदोर घरी परतले नाही.त्यामुळे कुटूंबिय चिंतेत होते. आज जंगलात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहीती मिळताच वनकर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. राजूरा तालुक्यात वाघाने घेतलेला हा नऊवा बळी आहे. सतत होणाऱ्या हल्यामुळे दहशत पसरली आहे.या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सूरू आहेत.