भंगाराम तळोधी / राजू झाडे
Advertisements
गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव समस्यांनी ग्रासले आहे.गावात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे.सांडपाणी वाहून नेणार्या नाल्यांचा उपसा करण्यात आलेला नाही.गावात असलेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
डोंगरगावात सांडपाणी वाहून नेणार्या नालींचे बांधकाम करण्यात आले. या नाल्या घाणीने आता तूडूंब भरलेल्या आहेत. नालीतील गाढ अद्यापही उपसा न केल्याने गावात डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरम्यान गाढ त्वरीत उपसण्याची मागणी गावकर्यांनी केली आहे.