अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कडक कार्यवाही करा

475

गोंडपिपरी यंग ब्रिगेडची मागणी

गोंडपिपरी

देशभरात सद्या महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.हाथरसमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तिव्र प्रतिसाद उमटले.अश्यातच तालुक्यातील थेनबोथला येथे काकाने अल्पवयीन पुतनीवर अत्याचार केला.या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करुण दोषीवर कडक कार्यवाही करण्याची मागणी गोंडपिपरी यंग ब्रिगेडने केली आहे

देशभरात सद्या महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे.नुकतेच उत्तरप्रदेशातील हाथरसमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तिव्र प्रतिसाद उमटत आहेत.यातच गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला येथे मानुसकीला काळीमा फासणारी घटना घडली.काकानेच १२ वर्षीय पुतणीवर अत्याचार केला.यापूर्वी सुद्धा संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.आणि हे सांगितले तर तुला जीवे मारण्याची धमकी दिली.भितीपोटी मुलीने घरच्यांना हे सांगितले नाही.मात्र मुलीवरती झालेला हा अत्याचार पाहून पालकांनी गोंडपिपरी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करुण दोषीवर कडक कार्यवाही करण्याची मागणी यंग ब्रिगेडने केली आहे.या सबंधिचे निवेदन ठाणेदार संदिप धोबे यांच्यामार्फतीने जिल्हा पोलिस अध्यक्षकांना पाठविले आहे.यावेळी गोंडपिपरी यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुरज माडुरवार,तालुका उपाध्यक्ष अमित भोयर,तारसा बुज शाखाध्यक्ष निकेश बोरकुटे,धाब्याचे सामाजिक कार्यकर्ता आशिष मुंजनकर,घडोली शाखाध्यक्ष केतन भोयर,नबात सोनटक्के,राहुल मेकर्तीवार,शुभम भोयर आदिंची उपस्थिती होती.