पुरग्रस्त शेतकर्यांना मदत कधी मिळणार ?

1107

 

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

गडचिरोली:
जिल्ह्यातील चामोर्शि तालुक्याच्या मुधोली रीठ परिसरातील गणपूर, हळदी, मुधोली तुकुम जैरामपुर लखमापूर बिक्शि बोरी कान्होली आदी ग्रा.पं. अंतर्गतची गावे वैनगंगा नदीलगत वसली आहे. गतमहीन्यात गोसेखुर्द धरणातिल पाण्याच्या विसर्गातून आलेल्या पुराचा या गावातील शेतीला मोठा फटका बसला. परिसरातील जवळपास अंदाजे २५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
गोसेखुर्द पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदी पात्रात दाब वाढला. परिणामी पूर परिस्थिती निर्माण होऊन मुधोली परिसरातील कापूस व धान पिकाचे नुकसान झाले.
ग्रामस्थांसोबत शासकीय अधिकार्यानी यांनी नुकसानग्रस्स्त पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले,परंतू अजुन पर्यंत कुठल्याही प्रकारची मदत दिली गेली नाही. तरी त्वरित आर्थिक मदत जाहीर करुन वितरित करावि. कोरोना महामारीच्या या पाश्वभूमीवर शेतकऱ्यांना अजुन देशोधडीला लावु नये. जर शासन कल्याणकारी राज्य असेल तर नुकसान भरपाई त्वरीत मिळण्याची मागणी बसपाचे जिल्हा महासचिव मारोती वनकर यांनी केली आहे.