कासवाने केली मगरीचा जबड्यातून सूटका…! कशी ? बघा….!

1146

मगरीचा जबडा किती मजबूत असतो हे तुम्ही पाहिलं असेल. मोठमोठ्या प्राण्यांची हाडे मगरीच्या जबड्यात बारीक होतात. पण एका कासवाचं कवच तोडणं मगरीला लोखंडी चणे चावण्यासारखं सिद्ध झालं. आता सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय. यात एक कासव त्याच्या कठोर कवचामुळे मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचे दिसेल.

हा व्हिडीओ आयआरएस Naveed Trumboo यांनी शेअऱ केलाय. त्यांनी याला कॅप्शन दिलंय की, ‘जर स्वत: या जगात जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला कासवासारखं व्हावं लागेल. जर तुमचे विचार मजबूत आणि शरीर मजबूत असेल तर तुम्हाला कुणीही तोडू शकत नाही’.

या १८ सेकंदाच्या व्हिडीओत बघितल जाऊ शकतं की, एक कासव मगरीच्या जबड्यात सापडलाय. मगरीने त्याला तोडण्याचा पूर्ण प्रयत्नही केला. मगरीला त्यात काही यश मिळत नाही. याच संधीचा फायदा घेत कासव आपली सुटका करू घेतो आणि पळ काढतो.

आतापर्यंत या व्हिडीओला दीड हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आणि १०० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांमध्ये जोश भरला गेला. कारण कुणी विचारही केला नसेल की, इतका हळू चालणारा एवढासा कासव कधी इतक्या मोठ्या मगरीच्या तोंडातून जिवंत वाचेल.