नगरसेवक गजानन चूंचुवार याचे निधन

553

 

चंद्रपूर /वर्षा बावनवाडे

तुकुमचे माजी नगरसेवक गजानन उर्फ गज्जू चुंचुवार यांचे रविवार 13 सप्टेंबर रोजी आकस्मिक निधन झाले.निधना समयी त्यांचे वय फक्त 50 वर्ष होते. काँग्रेस मध्ये असतांना आक्रमक नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. तुकूम परिसरात त्यांचे राहणे होते.आज अचानक त्यांची प्रकृती खालावली असता त्यांना चंद्रपूरात योग्य तो उपचार न मिळाल्याने त्यांना शेजारचे राज्य तेलंगानात नेत असतांना मंचेरियलच्या जवळपास एम्बुलेंस मध्येच त्यांची प्राणज्योत मावळली.अत्यंत मृदू स्वभावाचे असलेले गजानन चुंचुवार यांच्या मृत्यूने परिसर हळहळला. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसल्याने त्यांचे पिताश्री नारायण चुंचुवार हे पण दगावले