Home Breaking News ताडगाव येथे भव्य कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन..!!

ताडगाव येथे भव्य कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन..!!

108

ताडगाव येथे भव्य कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन.

प्रतिनिधी रविंद्र सदमवार

भामरागड तालुक्यातील मौजा ताडगाव येथे जय बाबलाई माता क्रीडा मंडळ, ताडगाव यांच्या वतीने भव्य कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ताडगाव येथील भव्य पटांगणावर मोठ्या उत्साहात या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य अहेरी मा. हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेसाठी व्हॉलीबॉल संघासाठी प्रवेश फी १००१ रुपये ठेवण्यात आली होती. परिसरातील अनेक गावांमधील संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
स्पर्धेतील पारितोषिकांमध्ये कबड्डी प्रथम पारितोषिक ३१,००१ रुपये मा. तनुश्रीताई आत्राम, सिनेट सदस्य गडचिरोली यांच्या कडून देण्यात आले. व्हॉलीबॉल प्रथम पारितोषिक ३१,००१ रुपये मा. हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या कडून जाहीर करण्यात आले.
कबड्डी द्वितीय पारितोषिक १५,००१ रुपये मा. रामबाई को. महाका, नगराध्यक्ष नगरपंचायत भामरागड यांच्या कडून देण्यात आले. व्हॉलीबॉल द्वितीय पारितोषिक १५,००१ रुपये मा. विष्णुभाऊ मडावी, उपाध्यक्ष नगरपंचायत भामरागड, तसेच सौ. तेजस्विनी मडावी व सौ. कविता येतमवार, सदस्य नगरपंचायत भामरागड यांच्या कडून देण्यात आले.
कबड्डी तृतीय पारितोषिक १०,००१ रुपये मा. लालसुभाऊ आत्राम, माजी उपसभापती पंचायत समिती भामरागड यांच्या कडून देण्यात आले. व्हॉलीबॉल तृतीय पारितोषिक १०,००१ रुपये मा. इंदरशाहा मडावी, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा माजी समाजकल्याण सभापती यांच्या कडून जाहीर करण्यात आले.
या स्पर्धेमुळे ताडगाव परिसरात क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली असून युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाला गावकरी, क्रीडाप्रेमी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!