Home Breaking News एटापल्ली येथे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात…

एटापल्ली येथे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात…

302

एटापल्ली येथे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

विदर्भ ब्युरोचीफ आदित्य चिप्पावार

एटापल्ली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नगरपंचायत एटापल्ली, पोलीस स्टेशन एटापल्ली व लोकमत सखी मंच एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने एटापल्ली येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास स्थानिक नागरिक, महिला व मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे या कार्यक्रमास श्रीमंत राजे अंबरीशराव महाराज आत्राम यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमास नगराध्यक्ष मा. रेखा मोहूर्ले, पोलीस निरीक्षक मा. मचिंद्र नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक मा. प्रतिज्ञा वणवे, बालविकास प्रकल्प अधिकारी मा. विद्याधर बुर्रीवार, डॉ. स्वाती रेड्डी, डॉ. प्रीती बुर्रीवार, डॉ. गायत्री शहारे, डॉ. प्रगती कावळे, आशाताई अतकमवार, नगरसेविका निर्मला कोंडबतुलवार, कनिका सरकार, ज्योती दोमलवार, सुरेखा अडगोपुलवार, सुशीला रचावार, मधूकरजी पुल्लूरवार, श्रीनिवासजी मावनूरवार, मनमोहनजी मंडल, प्रमोदजी देवतळे, पाणीपुरवठा सभापती राहुल कुळमेथे, नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार, महेश मोहूर्ले, अनिकेत मामीडवार व महेश पुल्लूरवार हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी संचालन पूजा पुल्लूरवार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात अनिता बोमकंटीवार यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्वेता उपाध्या यांनी केले.

लोकमत सखी मंचच्या स्वयंसेविका दिपाली नल्लावार, छाया मामीडवार, मनीषा आकुलवार, सुरेखा अडगोपुलवार, रेखा हमंद, रेखा कावळे, काव्या पुल्लूरवार, मनीषा गुप्ता, दिपाली सातपुते, सौजण्या अतकमवार, वैशाली खेडेकर व वैशाली पुपरेड्डीवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवक म्हणून मोलाचे योगदान दिले.

या कार्यक्रमासाठी नगरपंचायत एटापल्ली, पोलीस स्टेशन एटापल्ली, लोकमत सखी मंच, व्यापारी संघटना तसेच एटापल्लीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. कार्यक्रमामुळे महिला दिनाचा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचला असून उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Don`t copy text!