Home Breaking News गडचांदूर पोलिसांवर ६० हजारांच्या लाचेचा आरोप; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा असूनही आरोपींना पळवून लावल्याची...

गडचांदूर पोलिसांवर ६० हजारांच्या लाचेचा आरोप; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा असूनही आरोपींना पळवून लावल्याची चर्चा…

1247

गडचांदूर पोलिसांवर ६० हजारांच्या लाचेचा आरोप; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा असूनही आरोपींना पळवून लावल्याची चर्चा!

जिल्हा प्रतिनिधी गौरव मोहबे 

गडचांदूर:

एकीकडे ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत कडक कारवाईचा दावा करणाऱ्या गडचांदूर पोलिसांच्या भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ८ फेब्रुवारी रोजी बबन नारायण आत्राम या कामगारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याऐवजी, पोलिसांनी चक्क ६० हजार रुपयांची लाच घेऊन त्यांना फरार होण्यास मदत केल्याचा खळबळजनक आरोप पीडिताने केला आहे. ‘रक्षकच भक्षक’ बनल्याची भावना परिसरात उमटत असून या प्रकरणाने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
८ फेब्रुवारी रोजी रात्रीची ड्युटी संपवून घरी परतणाऱ्या बबन आत्राम यांना अंबुजा सिमेंटच्या उप्परवाही गेटजवळ अडवून सागर ऊर्फ मारखंडी बलकी, नितेश लांडे आणि ईश्वर गाडगे यांनी जातिवाचक शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी २५ फेब्रुवारी रोजी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (SC/ST Act) गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर आरोप
पीडित बबन आत्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार:
न्यायालयात हजेरी तरीही अटक नाही: ५ मार्च रोजी पीड़ित बबन आत्राम कोर्टात बयाणासाठी आले होते. तेव्हा आरोपी गड़चांदुर पोलीस स्टेशनमध्येही हजर झाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना अटक करण्याऐवजी सोडून दिले.

६० हजारांची डील?: ग्रामपंचायत सदस्याच्या मध्यस्थीने पोलिसांना ६० हजार रुपये देण्यात आले आणि त्यानंतरच आरोपींना फरार होण्याचा ‘सल्ला’ देण्यात आला, अशी चर्चा गावात रंगली आहे.

तपासाचा फार्स:
२७ फेब्रुवारीला एसडीपीओ (SDPO) जाधव यांच्याकडे बयाण नोंदवूनही त्यांच्या अधीनस्थ कनिष्ठ अधिकारी वर्गानि तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप होत आहे.
पीडिताची न्यायालयात धाव; सीडीआर तपासण्याची मागणी

या भ्रष्ट कारभारामुळे संतप्त झालेल्या बबन आत्राम यांनी आता थेट न्यायालयाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
> “ज्यांनी आरोपींना पळवून लावण्यासाठी मदत केली, त्या मध्यस्थी करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याचा व अबैद्य दारू व्यावसायीकाचा जो पोलीस स्टेशन गड़चांदुर ला महीना एंट्री फी देतो त्यांचा सीडीआर (CDR) तपासावा. दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करावे आणि आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तीला या गुन्ह्यात सह-आरोपी करावे,” अशी मागणी आत्राम यांनी केली आहे.

मोठा प्रश्न: कायद्याचा धाक की पैशाचा रुबाब?
सुरुवातीला ‘तत्परतेचे’ कौतुक करून घेणारे गडचांदूर पोलीस आता संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जातीय द्वेषातून झालेल्या हल्ल्यातील आरोपी उजळ माथ्याने फिरत असताना, पीडित कुटुंबाला मात्र न्यायासाठी वणवण भटकावे लागत आहे. बिरसा मुंडा युवा मंच गड़चांदुर पोलीसांचे झरितले भ्रष्ट शुक्राणु कौन ह्या विरुद्ध पोलीस स्टेशन पुढे सत्याग्रह करण्याच्या तयारित असल्याची माहिती सूत्रा कडून मिळाली आहे . पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या भ्रष्टाचाराच्या आरोपाची दखल घेणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!