घोट येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
चामोर्शी तालुक्यातील घोट येथील कर्डुड परिसरातील रहिवासी प्रकाश शेंडे यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. घोट येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. कुटुंबीयांनी पाहिले असता संबंधित व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. तात्काळ याबाबत घोट पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
या घटनेमुळे कार्डुल परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.







