Home Breaking News गडचिरोली बनणार राष्ट्रीय एक्सप्रेसवे नेटवर्कचा केंद्रबिंदू मुंबई–विशाखापट्टणम थेट सुपर एक्सप्रेसवे कॉरिडॉरला गती…

गडचिरोली बनणार राष्ट्रीय एक्सप्रेसवे नेटवर्कचा केंद्रबिंदू मुंबई–विशाखापट्टणम थेट सुपर एक्सप्रेसवे कॉरिडॉरला गती…

228

गडचिरोली बनणार राष्ट्रीय एक्सप्रेसवे नेटवर्कचा केंद्रबिंदू
मुंबई–रायपुर-विशाखापट्टणम सुपर एक्सप्रेसवे कॉरिडॉरला गती
जिल्हा संपादक नितेश खडसे
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारी मोठी घडामोड समोर आली आहे.
गडचिरोली–रायपूर–विझाग एक्सप्रेसवे कनेक्टर प्रकल्पासाठी DPR (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याच्या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तांत्रिक निविदा (Technical Bids) उघडण्यात आल्या आहेत.
या प्रकल्पासाठी दोन नामांकित कंपन्यांनी आपली बीड सादर केली आहे. त्यामध्ये
Intercontinental Consultants and Technocrats Pvt. Ltd. आणि
LN Malviya Infra Projects Pvt. Ltd.
या कंपन्यांचा समावेश आहे.
या कनेक्टर प्रकल्पामुळे भंडारा–गडचिरोली एक्सप्रेसवे थेट रायपूर–विझाग एक्सप्रेसवे ला जोडला जाणार असून, त्यामुळे देशात एक अखंड, प्रवेश-नियंत्रित (Access Controlled) सुपर एक्सप्रेसवे कॉरिडॉर प्रत्यक्षात येणार आहे.
मुंबई → नागपूर → भंडारा → गडचिरोली → रायपूर → विशाखापट्टणम
असा सलग, वेगवान आणि सुरक्षित महामार्ग मार्ग तयार होणार आहे.
विकासाचा नवा अध्याय
या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
औद्योगिक गुंतवणूक, लॉजिस्टिक्स, खाणकाम, स्टील उद्योग, वाहतूक आणि व्यापार क्षेत्राला मोठे बळ मिळणार असून, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्यापर्यंत थेट पोर्ट कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाल्याने गडचिरोलीचा राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक (Strategic) महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून उदय होणार आहे.
गडचिरोलीची नवी ओळख
आतापर्यंत दुर्गम, वनप्रदेश आणि आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीची ओळख आता बदलणार असून,
तो राष्ट्रीय लॉजिस्टिक हब आणि महत्त्वाचा आर्थिक जंक्शन पॉईंट म्हणून देशाच्या विकास नकाशावर ठळकपणे उमटणार आहे.
एकूणच, हा प्रकल्प केवळ रस्ते विकासाचा नसून, गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय ठरणार आहे.

Don`t copy text!