Home Breaking News आदिवासी रेला नृत्य मध्ये बंगाली मुलगा अनुप माझी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचा...

आदिवासी रेला नृत्य मध्ये बंगाली मुलगा अनुप माझी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचा हस्ते सन्मानित…

184

अनुप माझी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचा हस्ते सन्मानित
गडचिरोली (Anup Majhi) : जिल्हा प्रशासन गडचिरोली आणि सोबाय टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने “गडचिरोली पर्यटन परिवर्तन महोत्सव २०२५”चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप सोहळा गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात पार पडला. याप्रसंगी चामोर्शी तालुक्यातील शिमुलतला येथील अनुप माझी (Anup Majhi) याला गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जैयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्या हस्ते सन्मानित करून गौरविण्यात आले.

याप्रसंगी पारितोषिकांचे वितरण कार्यक्रमाला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अवीश्यंत पांडा,गडचिरोली निर्वाचन क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांचे हस्ते गौरविण्यात आले. चार दिवस चाललेल्या या महोत्सवात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. अनुप माझी (Anup Majhi) याला आदिवासी नृत्य व आदिवासी फॅशन शो या दोन श्रेणीत पुरस्कार प्राप्त झाले अनुपम माझी यांना आदिवासी नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक तर मूळ आदिवासी पोशाख विशेष पारितोषिक व पाच हजार एक रुपयाच्या धनादेश देऊन गौरविण्यात आले. गडचिरोली समारोप सोहळ्यात विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

बगांली भाषीक असलेल्या अनुप माझी (Anup Majhi) यांने डॉन्स गृप माध्यमातून आता पर्यत आदिवासी नृत्यावर विशेष लक्ष केद्रीत करून अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर करून अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे. मागील वर्षी कोया किंग आणि क्वीनकल्चर मॉडलिंग स्पर्धेत ही सन्मानित करण्यात आले होते. नृत्यातील वेगळेपणा यामुळे जिल्हयात अनुप माझीच्या गृप परिचित झाला अनेकांच्या मनात या गृपने भुरळ घातली असुन अनुप माझीला सन्मानित करण्यात आल्याने घोट परिसरात यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Don`t copy text!