Home Breaking News “शेतकऱ्यांना मोठा दिलासा : परसलगोंदी व हेडरी येथे धान खरेदी केंद्रांचे उत्साहात...

“शेतकऱ्यांना मोठा दिलासा : परसलगोंदी व हेडरी येथे धान खरेदी केंद्रांचे उत्साहात उद्घाटन”…

135

“शेतकऱ्यांना मोठा दिलासा : परसलगोंदी व हेडरी येथे धान खरेदी केंद्रांचे उत्साहात उद्घाटन”

प्रतिनिधी आदित्य चिप्पावार
एटापल्ली (गडचिरोली) :
आदिवासी विकास महामंडळाच्या उडेरा केंद्राअंतर्गत परसलगोंदी व हेडरी गावात धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. या केंद्रांचे उद्घाटन कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) यांच्या हस्ते करण्यात आले.
परसलगोंदी व हेडरी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी धान खरेदी केंद्र गावातच सुरू करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडे केली होती. या मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा भाकपाने केल्यामुळे यावर्षी परसलगोंदी येथे नवीन धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले. तसेच मागील वर्षी रेखणार व परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार हेडरी धान खरेदी केंद्रालाही भाकपाच्या प्रयत्नांतून मान्यता मिळाली होती. नागरिकांच्या संघटित मागणीला मिळालेले हे ठोस यश मानले जात आहे.
उद्घाटनप्रसंगी कॉ. सुरज जक्कुलवार (जिल्हा कार्यकारिणी सदस्य), रितेश जोई (तालुका सहसचिव), कॉ. विशाल पुज्जलवार, हेडरीचे उपसरपंच राकेश कवडो, रेखणारचे दशरथ उसेंडी, दानू हिचामी तसेच टीडीसीचे कर्मचारी प्रशांत डांगे यांच्यासह परसलगोंदीचे बबन मटामी, भूमिया गणेश मटामी, चंदू गावडे, मनोज पदा, दुलसा पदा, टिल्लू नरोटी, गुलाब सिडाम, बालाजी हिचामी, शिवाजी पदा, माधव नरोटी आदी मान्यवर उपस्थित होते.
परसलगोंदी व हेडरी गावातच धान खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी उडेरा केंद्रापर्यंत जावे लागत होते. आता गावातच धान विक्रीची सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ, खर्च व होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून ग्रामस्थांनी आदिवासी विकास महामंडळासह धान खरेदी केंद्र मंजूर करून देणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे व संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. शेतकरी, मजूर व आदिवासी जनतेच्या हितासाठी भाकपा पुढेही अशाच प्रकारे संघर्ष व पाठपुरावा करत राहील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

Don`t copy text!