धाबा येथे श्री संत परमहंस कोंडय्या महाराजांची जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी सिद्धार्थ दहागावकर
धाबा (ता. गोंडपिपरी) : गोंडपिपरी तालुक्यातील श्रीक्षेत्र धाबा येथे श्री संत परमहंस कोंडय्या महाराजांचा जयंती महोत्सव भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. या जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांनी पत्नी सौ. शुभांगीताई धोटे यांच्यासह उपस्थित राहून महाराजांच्या महाआरतीत सहभाग घेतला.
यावेळी मा. श्री. धोटे यांनी पूजा-अर्चना करून महाराजांच्या चरणी परिसरातील गोरगरीब जनतेला सुख, समाधान व समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना केली. देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना त्यांनी संत परंपरेचे महत्त्व व समाजात एकोपा, सेवा व सद्भावना जपण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक रेचनकर, शहराध्यक्ष राजु झाडे, देविदास सातपुते, धाबा काँग्रेसचे नामदेवराव सांगडे, विनोद नागपुरे, बालाजी चणकापुरे, गौतम झाडे, राहुल लडके, धीरेंद्र नागपुरे, अनिल कोरडे, महेश सोनकुलवार, शंकर येळमुळे, संतोष बंडावार, माधव लडके, कवडू कुबडे, दिलीप पुलगमकर, पायल दुर्गे, रेखा रामटेके, माधुरी सातपुते, अर्पणा रेचनकर, किरण नागपुरे, अर्चना झाडे, संजय झाडे, उर्मिला चणकापुरे, विद्या नागपुरे, संगीता झाडे, संगीता सांगळे, दीपा खरबनकर, पुरुषोत्तम रेचनकर, शालिक झाडे यांच्यासह गोंडपिपरी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







