आनंद निकेतन महाविद्यालयाच्या NSS विशेष शिबिराचे उद्घाटन प्रेरणादायी वातावरणात
प्रतिनिधी संकेत कायरकर
शेगाव (खु):
आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) विशेष शिबिराचे उद्घाटन आज (ता. 20)शेगाव (खुर्द), ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथे अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. ‘सशक्त भारतासाठी युवाशक्ती शिबिर’ या शीर्षकाखाली हे शिबिर १९ ते २५ जानेवारी 2026या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभाची सुरुवात एन.एस.एस. झेंडा फडकावून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे होते, तर उद्घाटक म्हणून मा. श्री. सुधाकर कडू गुरुजी (विश्वस्त, महारोगी सेवा समिती, आनंदवन, वरोरा) उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात सुधाकर कडू गुरुजी म्हणाले, “आव्हानांना सामोरे जातो तोच खरा युवा असतो. राष्ट्रीय सेवा योजना युवकांना समाजासाठी काम करत स्वतःला घडवण्याची संधी देते.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी सांगितले, “माणसा-माणसांना जोडणे हेच आपले खरे काम आहे. समाजाशी नाते जोडणारे विद्यार्थीच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते ठरतात.” त्यांच्या या विचारांनी उपस्थितांना विशेष प्रेरणा दिली.
प्रमुख अतिथी म्हणून गावचे सरपंच मोहित लबाने, उपसरपंच उषा जीवतोडे, ग्रामसेवक राहुल शिरपूरकर, धीरज वैरागडे (अध्यक्ष, तंटामुक्ती समिती), सौ. स्वाती ननावरे (पोलीस पाटील), उपप्राचार्या प्रा. राधा सवाने, प्रा. रंजना लाड, ज्येष्ठ नागरिक चंद्रशेखरजी भिवदरे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, गावातील नागरी,महिला भगिनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नीरज आत्राम( रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी) यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सुरेश राठोड ( रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी)यांनी केले, तर आभार प्रा. धनश्री पाचभाई ( रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी)यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
उद्घाटन समारंभाने संपूर्ण शिबिराला सेवाभाव, सामाजिक बांधिलकी व युवकशक्तीचा सकारात्मक संदेश देणारी दिशा दिली.







