Home Breaking News सहपालकमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न…

सहपालकमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न…

80

गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

खासदार डॉ.नामदेव किरसान यांची दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थिती

मुख्य संपादक प्रशांत शाहा

गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिषजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. या बैठकीला *खासदार डॉ. नामदेव किरसान* यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती दर्शवली.

यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या विकासकामांना प्राधान्याने मंजुरी देऊन निधीचे योग्य वितरण करण्यात यावे, अशी मागणी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे केली.

बैठकीत सन २०२६–२७ साठीच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली तसेच चालू आर्थिक वर्षातील जिल्हा विकास निधीतील खर्चाचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस आमदार अभिजित वंजारी, आमदार रामदास मसराम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्ह्याचे पालक सचिव तथा वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एम. अरुण, नियोजन उपायुक्त अनिल गोतमारे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Don`t copy text!