सकमूर ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विनोद अलोने यांची निवड….

94

प्रतिनिधी/सिद्धार्थ दहागावकर:

गोंडपिपरी: तालुक्यातील सकमूर ग्रामपंचायत कार्यालय येथे गुरुवार, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीसाठी झालेल्या सभेत ग्रामपंचायत सदस्य संतोष मुगलवार यांचे विश्वासू सहकारी व गावातील सक्रीय समाजसेवक विनोद अलोने यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडणुकीत माजी अध्यक्षांचा पराभव करत विनोद अलोने यांनी भरघोस मतांनी विजय मिळवला. त्यांच्या या विजयाने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. निवडीनंतर बोलताना त्यांनी युवक वर्ग, प्रतिष्ठित नागरिक तसेच सकमूर-चेकबापूर ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी ग्रामशांतता व तंटामुक्त गाव घडविण्यासाठी बांधिलकी व्यक्त केली. या सभेला संदेश काळे, महेश घुबडे, विनोद काळे, भारत गोंगले, बंडू अलोणे, संजय तेलजीरवार, शामराव काळे, संतोष पूचलवार, भारत अलोने, विनोद जनकिराम जाकुलवार, सचिन अलोने, राहुल जकुलवार, नितेश कोठावार, बंडू अलोने, आनंदराव जकुलवार आणि आकाश येलमुले यांसह गावातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.