प्रतिनिधी संकेत कायरकर:
वरोरा : महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योग परिषद, चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय वरिष्ठ गट योगासन क्रीडा स्पर्धा दिनांक २२ ते २४ ऑगस्ट २०२५ दरम्यान मुख्यमंत्री सभागृह, आनंदवन येथे भव्य स्वरूपात आयोजित होणार आहे.
या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून २०० महिला व पुरुष खेळाडू सहभाग घेणार आहेत. खेळाडू विविध प्रकारच्या योगासन सादरीकरणांद्वारे आपले कौशल्य प्रदर्शित करतील.
स्पर्धेतील एकूण १० योग प्रकारांचा समावेश असेल ज्यात
ट्रेडिशनल योगासन
आर्टिस्टिक योगासन (सिंगल)
आर्टिस्टिक योगासन (पेअर)
रिदमिक योगासन (पेअर)
फॉरवर्ड बेंड (इंडिविज्युअल)
बॅक बेंड हॅण्ड बॅलन्स
लेग बॅलन्स ट्विस्टिंग बॉडी सुपाईन.
या राज्यस्तरीय स्पर्धेमधून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडल्या जाणार आहे आणि तो संघ राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ डॉ. विकास आमटे सचिव महारोगी सेवा समिती, आनंदवन आणि डॉ.सौ.भारती आमटे वैद्यकीय अधिकारी तथा ज्येष्ठ समाजसेविका आनंदवन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून मा. करण देवतळे आमदार वरोरा-भद्रावती विधानसभा, विशेष अतिथी मान. श्री श्रीकांत पाटील अध्यक्ष लोक शिक्षण संस्था वरोरा, डॉ. अरुण खोडसकर सहकार्यवाहक बृहन महाराष्ट्र योग परिषद अमरावती, अतिथी म्हणून सौ.पल्लवी आमटे अंतर्गत व्यवस्थापक महारोगी सेवा समिती, आनंदवन,श्री. राजेश पवार सचिव, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, श्री. सतीश मोहोगावकर तांत्रिक सचिव महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन, डॉ.विजय पोळ वैद्यकीय अधिकारी महारोगी सेवा समिती वरोरा, श्री.सुधाकर कडू, विश्वस्त महारोगी सेवा समिती वरोरा, श्री.माधव कवीश्वर जेष्ठ कार्यकर्ते तथा मार्गदर्शक महारोगी सेवा समिती, वरोरा, प्रा . राधा सवाने उपप्राचार्य आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा,इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तसेच मा.श्री. श्रीकांत पाटील अध्यक्ष लोक शिक्षण संस्था वरोरा व चंद्रपूर जिल्हा योग असोसिएशन यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित मा. श्री.संजय मालपाणी अध्यक्ष महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन तसेच सचिव एशियन योगासन स्पोर्ट्स असोसिएशन,मा.श्री.योगेशजी कौटकर तहसीलदार वरोरा, प्रमुख उपस्थिती म्हणून मा.डॉ
राकेश तिवारी समन्वयक तदर्थ समिती महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन, मान.श्री सदाशिव ताजने,विश्वस्त महारोगी सेवा समिती वरोरा,मान.डॉ.अरुण खोडस्कर सहकार्यवाहक बृहन महाराष्ट्र योग परिषद, अमरावती, मा. श्री राजेश पवार सचिव महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, मा.श्री. राजेश पवार सचिव महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, मान.श्री. सतीश मोहगावकर तांत्रिक सचिव महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, प्रा.सौ.राधा सवाने, उपप्राचार्य आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा,इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात होणारी ही स्पर्धा खेळाडूंना केवळ शारीरिक क्षमता आणि लवचिकतेचे प्रदर्शन करण्याची संधी देणार नाही, तर मानसिक एकाग्रता, समतोल आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठीही महत्त्वाची ठरणार आहे.
या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन प्राचार्य डॉ. मृणाल काळे अध्यक्ष चंद्रपूर डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रा.श्री.तानाजी बायस्कर सचिव चंद्रपूर डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशन तसेच संपूर्ण पदाधिकारी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि महाविद्यालयातील खेळाडूंनी केले आहे.
स्थानिक नागरिक, योगप्रेमी आणि विद्यार्थी यांनी या तीन दिवसीय भव्य स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.