Home चंद्रपूर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून गुंडावार व मोहुर्ले कुटुंबीयांचे सांत्वन… तीन तरुणांचा करुण...

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून गुंडावार व मोहुर्ले कुटुंबीयांचे सांत्वन… तीन तरुणांचा करुण अंत – सावली येथील गणेश विसर्जना दरम्यानची घटना…

983

सावली: गेल्या शनिवारी गणपती विसर्जना करिता गेलेल्या सावली तालुक्यातील तीन युवकांचा कवाडी नहरात बुडून करून अंत झाला. या हृदयात घटनेची माहिती मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी आज तात्काउळ सावली तालुक्यातील चांदली व सावली येथे जाऊन मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. व निराधार झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदतही केली.

सावली शहरातील सावली- कवठी मार्गावरील खाती कामठा परिसरात जय बजरंग युवा गणेश मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. दहा दिवस लोटल्यानंतर आपल्या आवडत्या बाप्पाला निरोप देण्याकरिता गोसे खुर्दच्या कवाडी नहरात गेले असता विसर्जनादरम्यान सात ते आठ जण नहरात उतरले. नहराचा प्रवाहा जास्त असल्याने पाण्यात उतरलेले वाहून जात असल्याचे भक्ताच काहींना यथाशक्ती प्रयत्न चालवून उपस्थित आणि बाहेर काढले. मात्र सदर अनुचित घटनेत तीन तरुणांचा करुण अंत झाला. यात सावली येथील सचिन मोहुर्ले , तर सावली तालुक्यातील चांदली येथील संदीप गुंडावार, नीकेश गुंडावार यांचा समावेश होता. या घटनेची माहिती मिळताच आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ सावली दौरा करून सावली तालुक्यातील चांदली व सावली येथील गुंडावार व मोहूर्ले कुटुंबीयांचे सांत्वन पर भेट घेऊन आपल्या दुःखात सहभागी ग्वाही देत आर्थिक मदतही केली.

याप्रसंगी प्रामुख्याने माजी जि. प. उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, माजी जि. प. सभापती दिनेश चीटनुरवार, सावली नगराध्यक्ष लता लाकडे, तालुकाध्यक्ष नितीन गोहने, शहराध्यक्ष नगरसेवक विजय मुत्यालवार, माजी प. स .सभापती विजय कोरेवार, नगरपंचायत सावलीच्या नगरसेविका तथा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Don`t copy text!